AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhandara Crime | पुतण्याने काकाच्या नावावर काढले कर्ज; भंडाऱ्यात बँक व्यवस्थापकासह पुतण्याला बेड्या

कर्जाचे हप्ते थकल्याने रुपचंद पर्वते यांना बँकेकडून नोटीस आल्याने संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सेवानिवृत्त शिक्षक असलेल्या काकाने विचारपूस केली असता पुतण्याने ही बाब कबूल केले.

Bhandara Crime | पुतण्याने काकाच्या नावावर काढले कर्ज; भंडाऱ्यात बँक व्यवस्थापकासह पुतण्याला बेड्या
भंडाऱ्यात बँक व्यवस्थापकासह पुतण्याला बेड्या
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 9:44 AM

भंडारा : पैशाच्या मोहापाई माणूस आपल्याच नातेवाईकाची आर्थिक लुबाडणूक करत असल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात उघड झालाय. होंडा शोरूमसाठी (Honda Showroom) आरोपी पुतण्याने चक्क आपल्या काकाचे बनावट दस्तावेजावर बँकेत सादर करून तब्बल 16 लाखांचे कर्ज काकाच्या नावावर काढले. आपल्या सख्या काकाची फसवणूक केली. भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सेंदुरवाफा येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या (Bank of Maharashtra in Sendurwafa) शाखेत ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बँक मॅनेजरसह (Bank Manager) पुतन्याला साकोली पोलिसांनी गजाआड केले आहे. मोरेश्वर मेश्राम असे मॅनेजरचे नाव आहे. मंगेश पंढरी पर्वते असे पुतन्याचे नाव आहे. खोटे कागदपत्र दाखवून लुबाडणूक केल्यानं दोघांनाही पोलिसांनी आता बेड्या ठोकल्यात.

काकाची संपत्ती मॉर्गेज ठेवली

होंडा शोरूमसाठी आरोपी पुतण्याने काकाचे बनावट दस्तावेजावर उचलले 16 लाखांचे कर्ज घेतले. बँक मॅनेजरसह पुतन्याला साकोली पोलिसांनी गजाआड केले. मंगेश पर्वते याला होंडा शोरूम काढण्यासाठी 13 लाख रुपयांच्या कर्जाची गरज होती. यासाठी मंगेशने बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेला संपर्क केला. कर्जासाठी जमीन मॉर्गेज करण्यासाठी अट होती. त्यासाठी त्याने गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध येथील आपले काका रूपचंद भाऊराव पर्वते (वय 55) यांच्या नावाने असलेली संपत्ती मॉर्गेज ठेवले. नवेगावबांध येथील गट क्र. 946/7 वरील प्लॉट क्र. 2 वर घर बांधकामासाठी बनावट कागदपत्र तयार करत 13 लाखांचे गृहकर्ज घेतले. काकाला न कळवता कर्ज मंजूर करून घेतले. यासाठी मॅनेजर मोरेश्वर मेश्राम याने त्याला मदत केली.

कर्जाचे हप्ते थकल्याने नोटीस

मात्र कर्जाचे हप्ते थकल्याने रुपचंद पर्वते यांना बँकेकडून नोटीस आल्याने संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सेवानिवृत्त शिक्षक असलेल्या काकाने विचारपूस केली असता पुतन्याने ही बाब कबूल केले. कर्जाचे हप्ते भरण्यासाठी परत 3 लाख रुपयांची मदत केली. मात्र आरोपी पुतन्याने पैसे कर्जाचे हप्ते न भरता परस्पर वापरल्याने काकाने आरोपी पुतण्या व बँक मॅनेजर विरोधात साकोली पोलिसांत 16 लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी तक्रार दिली. याप्रकरणी मंगेश पर्वते व मोरेश्वर मेश्राम यांच्याविरुद्ध कलम 420, 409, 467, 471, 34 भादंवी अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. साकोली पोलिसांनी मोरेश्वर मेश्राम व मंगेश पर्वते यास अटक केली आहे. अशी माहिती साकोलीचे पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.