Bhandara BJP | मोहाडी नगरपंचायतीवरून ठरणार जिल्हा परिषदेतील सत्ताधीश!; भाजपचे नगरसेवक दोन गटात विभाजित?

भंडारा भाजपात माजी भाजप आमदार चरण वाघमारे यांनी स्वतःची होणारी गळचेपी उघडपणे बोलून दाखविली. याच आपसी मतभेदातून निर्माण झालेल्या वादामुळे येत्या काही दिवसात मोहाडी नगरपंचायतीचे वेगळे चित्र दिसणार आहे. मोहाडी नगरपंचायतीच्या अध्यपदाच्या निवडणुकीतमोठा राजकीय भूकंप घडण्याची शक्यता आहे.

Bhandara BJP | मोहाडी नगरपंचायतीवरून ठरणार जिल्हा परिषदेतील सत्ताधीश!; भाजपचे नगरसेवक दोन गटात विभाजित?
मोहाडी नगरपंचायत
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 11:33 AM

तेजस मोहतुरे

भंडारा : जिल्ह्यासाठी निवडणुकीच्या दृष्टिने घडत असलेल्या राजकीय घडामोडीने अतिशय संवेदनशील महिना ठरला आहे. अवघ्या काही दिवसात जिल्हा परिषद (Zilla Parishad) व नगरपंचायत (Nagar Panchayat) अध्यक्षीय पदासाठी निवडणूक होणार आहे. आपल्या गटातील अध्यक्ष असावा, यासाठी जिल्ह्यात घोडेबाजारास सुरुवात झाली आहे. याउलट भंडारा भाजपात मात्र अंतर्गत घोडेबाजार पहायला मिळत आहे. मोहाडी आणि लाखांदूर या नगरपंचायतीवर भाजपाने बहुमत मिळविले. मोहाडी नगरपंचायतीत 17 जागांपैकी 9 जागा भाजपाने जिंकल्या आहेत. आता येथे बहुमत भाजप सत्ता स्थापन करेल, हे स्पष्ट आहे. मात्र मोहाडी नगरपंचायतीमध्ये भाजपाचे अंतर्गत राजकरण सर्वांच्या भुवया उंचावायला भाग पाडत आहे. भाजप खासदार सुनील मेंढे (MP Sunil Mendhe) यांनी बोलविलेल्या मोहाडी नगरपंचायत भाजपच्या गटाच्या बैठकीत 9 पैकी 5 नवनिर्वाचित नगरसेवक हजर होते. बाकी 4 नगरसेवक गैरहजर होते. यात महत्त्वाचे म्हणजे भंडारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष शिवराम गिरेपुंजे यांनी मोहाडी नगरपंचायतीत जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येणाऱ्या भाजपा अधिकृत गटाच्या प्रमाणपत्र वेळी बोलावलेल्या बैठकीत केवळ हे 5 नगसेवक हजर होते. त्यामुळे नाईलाजाने गिरेपुंजे यांना 5 नवनिर्वाचित नगरसेवकांच्या गटांचे प्रमाणपत्र सादर करावे लागले.

4 नगरसेवक गैरहजर का?

मोहाडी नगरपंचयतीमध्ये भाजपाच्या तिकिटावर 9 नगरसेवक निवडूण आले असताना केवळ 5 नगरसेवकांच्या अधिकृत गटांचे प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याची नामुश्की भाजपाला का आली? इतर 4 नगसेवक का गैरहजर होते? आता हाच खरा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे हजर असलेले 4 नवनिर्वाचित नगरसेवक हे चरण वाघमारे यांच्या गटांचे असल्याचे बोलले जाते. त्यांना होणारा विरोध हा गैरहजर असल्याच्या प्रकाराला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. मोहाडी नगरपंचायतीमध्ये ज्या भाजपा अधिकृत गटाचे प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळाले आहे, त्यात हेमचंद पराते, यादोराव कुंभारे, पूनम धकाते, अश्विनी डेकाटे, सविता साठवणे या भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा समावेश आहे. इतर 4 भाजपाच्या नगरसेवकांचे त्यात नाव नाही. त्यामुळे आता मोठ्या चर्चेला उधाण आले आहे. हे सदस्य राष्ट्रवादी आमदारांच्या संपर्कात तर नाही ना असा प्रश्न निर्माण होत आहे. चरण वाघमारे यांचा विरोधातील एक गट पर्यटनासाठी गेलाय. आता मोहाडी शहरात राजकीय चर्चेला उधाण आलेला आहे. कारण मोहाडी नगरपंचायत महिला अनुसूचित जाती राखीव आहे. भाजपशिवाय कोणत्याही पक्षाची महिला अनुसूचित जातीची नगरसेवक नाही. तर पक्षीय बलावर बघता भाजप 9, राष्ट्रवादी 6 व काँग्रेस 2 असे आहे. राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेस 3 नगरसेवकांची गरज आहे.

तर… जिल्हा परिषदेत चित्र पालटेल

या सर्व प्रकाराने माजी आमदार चरण वाघमारे यांचा गट चांगलाच संतापला आहे. आपल्या नेत्याचे पक्षात होणारे खच्चीकरण लक्षात घेता वाघमारे गट आपली वेगळी चूल मांडण्यास तयार झाला आहे. आपल्यास मोहाडी नगरपंचायतीत दगाफटका झाल्यास 6 जिल्हा परिषद सदस्य काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेस पाठबळ देतील, असे उघड वक्तव्य चरण वाघमारे गट करू लागला आहे.

Nagpur NMC | नदी काठावरील अतिक्रमणाविरुद्ध मोठी कारवाई; न्यायालयाच्या आदेशानंतर नागपूरचे मनपा आयुक्त म्हणाले…

Nagpur Corona | नागपूरच्या जिल्हाधिकारी म्हणतात, कोरोनाला गंभीरतेने घ्या; महिनाभरात शंभरावर मृत्यू

Nagpur Police | नागपूर पोलिसांवर कोरोनाचा मोठा आघात; दीडशेच्या वर पोलीस पॉझिटिव्ह, हायजिनीक किटचे वाटप

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.