Sunil Mendhe | नाना पटोलेंचे कार्यकर्ते धान घोटाळ्यात सहभागी? भंडाऱ्याचे खासदार सुनील मेंढे यांचा गौप्यस्फोट, सीबीआय चौकशी होणार

भंडारा हा धानाचा कोठार. या धानाच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला होता. या प्रकरणी आता सीबीआय चौकशी होणार आहे. नाना पटोले यांच्या जवळचे कार्यकर्ते या घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप खासदार सुनील मेंढे यांनी लावलाय.

Sunil Mendhe | नाना पटोलेंचे कार्यकर्ते धान घोटाळ्यात सहभागी? भंडाऱ्याचे खासदार सुनील मेंढे यांचा गौप्यस्फोट, सीबीआय चौकशी होणार
भंडाऱ्याचे खासदार सुनील मेंढे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले.Image Credit source: facebook
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 11:43 AM

भंडारा : भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील धान घोटाळ्यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे कार्यकर्तेच सामील असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे खासदार सुनील मेंढे (Sunil Mendhe) यांनी केला. पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. या प्रकरणी त्यांनी सीबीआय (CBI) चौकशीची मागणी केली आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या काही काळात भंडारा गोंदियातील धान घोटाळा उघड होणार असल्याचा विश्वास खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केला आहे. 2019 मध्ये खरीप आणि रब्बी हंगामात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने धान खरेदी झाली. धान खरेदीत मोठा घोटाळा झाला आहे. मोठ्या प्रमाणात बनावट सातबारा नमुना आठ जोडून शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांकडून शासकीय धान खरेदी करण्यात आली. याची तक्रार वारंवार करून कोणतीही ठोस उपाययोजना झाली नव्हती. खासदार मेंढे यांनी अधिवेशनात भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील धान खरेदी घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली. आता ही मागणी मान्य झाली.

धान खरेदी केंद्र संचालकाचे धाबे दणाणले

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता सीबीआयकडून भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील धान घोटाळ्याची माहिती मागवणे सुरू झाले आहे. चक्क सीबीआय चौकशी करणार असल्यामुळे आता धान खरेदी केंद्र संचालकाचे धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे आताचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधानसभा अध्यक्ष असताना त्यांनी एसआयटीमार्फत घोटाळ्याचे चौकशीचे आदेश दिले होते. याबाबत खासदार सुनील मेंढे यांना विचारले असता स्वतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे कार्यकर्ते या धान घोटाळ्यात सामील होते. त्यामुळं चौकशी दाबण्याचा प्रकार त्यांच्याकडून पर्यायाने महाविकास आघाडी सरकारकडून होत असल्याच्या आरोप ही त्यांनी केला आहे.

19 राईस मिलर्स दोषी

विशेष म्हणजे केंद्र सरकारने भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील 19 राईस मिलर्सला दोषी मानत त्यांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश दिले होते. महाविकास आघाडी सरकार स्वतः मिलर्सला वाचविण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप केला आहे. एकीकडे नाना पटोले स्वतःला शेतकरी नेते भूमिपुत्र म्हणून घेतात. दुसरीकडे शेतकऱ्यांचे अहित करतात, असा खोचक टोला खासदार सुनील मेंढे यांनी लगावला आहे. त्यामुळे येत्या काही काळात धान घोटाळ्याची सीबीआयद्वारे चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Ph.D : ‘पीएचडी’ वाल्यांसाठी नोकरी ! परीक्षा द्यावी लागणार नाही, 5 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख, ‘या’ पत्त्यावर अर्ज पाठवा

Video Navneet Rana | हनुमान जयंतीला हनुमान चालीसा पठण करणार, मंदिरावर भोंगे लावणार; खासदार नवनीत राणा यांचे वक्तव्य

Video Raju Karemore | भंडाऱ्यात जय भीमच्या तालावर थिरकले आमदार, राष्ट्रवादीच्या राजू कारेमोरेंचा डान्स एकदा बघाच…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.