Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhandara Crime | बनावट दुचाकी-देशी कट्ट्यासह रात्रीची सफर, घातपाताची शक्यता; दोन आरोपींना भंडारा पोलिसांनी केले जेरबंद

भंडाऱ्यात देशी कट्टासह दोघांना अटक करण्यात आली. मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. बनावट नंबरची दुचाकी जप्त करण्यात आली.

Bhandara Crime | बनावट दुचाकी-देशी कट्ट्यासह रात्रीची सफर, घातपाताची शक्यता; दोन आरोपींना भंडारा पोलिसांनी केले जेरबंद
आरोपींना अटक केल्यानंतर भंडारा गुन्हे शाखेचे पोलीस.
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 10:41 AM

तेजस मोहतुरे

भंडारा : रात्रीच्या वेळेत संशयितरित्या दोन युवक (Suspected Youth ) फिरत होते. गस्तीवरील पोलिसांनी त्यांची चौकशी केली. पंचासमक्ष त्यांची बॅग खोलण्यात आली. त्यांच्याकडे देशी कट्टा (Deshi Katta) आढळला. शिवाय त्यांच्या दुचाकीवर चारचाकी गाडीचा नंबर होता. त्यामुळं पोलिसांचा संशय आणखीणच बळावला. भंडारा शहरात लगत ही घटना घडली. या प्रकरणी भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने (Crime Branch) दोन आरोपीला अटक केली आहे. अमन ओमप्रकाश ब्रह्मो (22) व नीतेश भोजलाल पटले (21) अशी आरोपींची नावे आहेत. दोघेही बालाघाट जिल्ह्यातील कोसमी येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून देशी कट्टासह चोरीची दुचाकी सुद्धा जप्त कररण्यात आली.

दुचाकी गाडीला दिले चारचाकीचे नंबर

भंडारा जिल्ह्यात ऑलआऊट ऑपरेशन राबविण्यात येत आहे. या अंतर्गत भंडारा शहरातील शास्त्री चौक ते सिंधी कॉलनी मार्गावर पोलिसांची गस्त सुरू होती. कब्रस्तानच्या बाजूला असलेल्या एका ऑटो रिपेअरिंग सेंटरजवळ दोन युवक संशयितरित्या फिरताना आढळले. याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तिथं पोहोचले. त्या दोघांची विचारपूस करण्यात आली. दोघेही तरुण उत्तर दिताना चाचपडत होते. तपासणी केल्यानंतर त्यांच्या ताब्यात असलेली एक देशी कट्टा -चोरीची दुचाकी इतर साहित्य जप्त करण्यात आले.

मोठ्या घातपाताची शक्यता टळली

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समयसूचकता दाखविली. त्यामुळं दोन्ही तरुणांना वेळीच पकडण्यात यश आलंय. त्यांच्या ताब्यातून अवैधरीत्या वापरात असलेला गावठी बनावटीचा देशी कट्टा जप्त करण्यात आला. त्याची किंमत सात हजार रुपये आहे. दुचाकी साहित्याची किंमत 47 हजार 265 रुपये सांगण्यात येत आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीच्या अटक झाल्यानं मोठी घातपाताची शक्यता टळली.

Nagpur | तुमचा पाल्य वसतिगृहात शिकतो, काय आहेत नियम?; काय म्हणतात, समाज कल्याण आयुक्त जाणून घ्या

Nagpur Police | मालकाच्या नावाचा बनावट मेल; पैसे तिसऱ्याला पाठवायला सांगितले, फेक अकाउंट निघाल्याने अडचण

Nagpur Accident | टायर फुटल्याने कार डिव्हायडरवर धडकली; नागपुरातील कोंढाळीजवळ अपघात, तीन जण जागीच ठार

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.