Video-Bhandara | आमदार कारेमोरेंचा ठाण्यात गोंधळ! व्यापाऱ्याचे 50 लाख पळविले; पोलीस म्हणतात, शासकीय कामात अडथळा, नेमकं काय चाललंय भंडाऱ्यात?
तेजस मोहतुरे भंडारा : व्यापारी मित्राला पोलिसांनी बेदम मारहाण केली म्हणून आमदार राजू कारेमोरेंनी मोहाडी पोलीस ठाण्यात जाऊन धिंगाणा घातला. पोलिसांनी 50 लाख रुपयांची रोख रक्कम पळविल्याची आमदार मित्रांनी पोलिसात तक्रार केली. तर पोलिसांनी देखील आरोपीविरुद्ध शासकीय कामात अडथळा करत असल्याची तक्रार केली. मोहाडीचे पोलीस निरीक्षक राहुल देशमुख म्हणतात, दोघांचीही चौकशी सुरू आहे. व्यापारी-पोलिसांची एकमेकांविरोधात […]
तेजस मोहतुरे
भंडारा : व्यापारी मित्राला पोलिसांनी बेदम मारहाण केली म्हणून आमदार राजू कारेमोरेंनी मोहाडी पोलीस ठाण्यात जाऊन धिंगाणा घातला. पोलिसांनी 50 लाख रुपयांची रोख रक्कम पळविल्याची आमदार मित्रांनी पोलिसात तक्रार केली. तर पोलिसांनी देखील आरोपीविरुद्ध शासकीय कामात अडथळा करत असल्याची तक्रार केली. मोहाडीचे पोलीस निरीक्षक राहुल देशमुख म्हणतात, दोघांचीही चौकशी सुरू आहे.
व्यापारी-पोलिसांची एकमेकांविरोधात तक्रार
तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांचे दोन व्यापारी मित्र हे काल रात्री दहा वाजता तुमसरकडे जात होते. सोबत त्यांनी आमदारांच्या घरून त्यांनी 50 लाख रुपयांची रोकड घेतली होती. मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंळाच्या स्टँग रूमच्या बंदोबस्ताकरिता लावण्यात आलेल्या पोलिसांनी कार अडविली. वळण असताना गाडी चालकांना इंडिकेटर का दिले नाही म्हणून दुचाकी वाहनाने पोलिसांनी कारचा पाठलाग केला. गाडीतील यासीम छावारे आणि अविनाश पटले या दोन व्यक्तींना बेदम मारहाण केली. त्यांच्याजवळील 50 लाख रुपयांची रोख रक्कम आणि एक सोन्याची चेन पोलिसांनी पडविली. अशी तक्रार यासीम छवारे यांनी मोहाडी पोलिसात दिली आहे. तर बंदोबस्तावर तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक राणे यांनी देखील पटले आणि धवारे यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांची तक्रार दाखल करून घेत तपास सुरु केला.
आमदारांचा पोलिसांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल
दुसरीकडे आमदार राजू कारेमोरे यांनी खाकी वर्दी घालून दबंगगिरी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली. आता स्वतः गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा पोलिसांना अश्लील शिवीगाळ करीत दमदाटी करीत असल्याचा व्हिडियो व्हायरल झाला. फिर्यादींना केलेली अमानुष मारहाण पाहता खाकी वर्दीतील गुंड प्रवृत्ती समोर आली आहे. त्यामुळं आता या प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषीवर कारवाई होणार काय याकडं पाहावं लागेलं.