बड्या नेत्याचा गनिमी कावा, भंडाऱ्यात प्रफुल्ल पटेल यांना जबर धक्का, अनेकांच्या भुवया उंचावल्या

प्रफुल्ल पटेल यांचे खंदे समर्थक असलेल्या एका बड्या नेत्याने भंडाऱ्यात चांगलाच गनिमी कावा करुन दाखवला आहे. या नेत्याने ऐन लोकसभा निवडणुकीच्यावेळी आपण शरद पवार गटासोबत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बड्या नेत्याचा गनिमी कावा, भंडाऱ्यात प्रफुल्ल पटेल यांना जबर धक्का, अनेकांच्या भुवया उंचावल्या
अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचा फाईल फोटो
Follow us
| Updated on: Mar 20, 2024 | 6:21 PM

भंडारा | 20 मार्च 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला आता शरद पवार गटाकडून धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहेत. अजित पवार गटाचा बीडमधील मोठा नेता आज शरद पवार यांच्या गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी नुकतंच शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन झालं. तसेच आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचं ते त्या कार्यक्रमात म्हणाले. त्यामुळे अजित पवार गटासाठी हा धक्का मानला जात होता. या दोन धक्क्यानंतर आता अजित पवार गटाला भंडाऱ्यात धक्का बसला आहे. खरंतर भंडाऱ्यात अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची ताकद आहे. पण त्यांच्या वर्चस्वाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. भंडाऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार मधुकर कुकडे हे शरद पवार गटात सहभागी होत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भंडाऱ्यात कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक आज घेण्यात आली. या बैठकीत खासदार प्रफुल्ल पटेल यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे कुणबी समाजाचे नेते माजी खासदार मधुकर कुकडे यांची उपस्थिती लावली. मधुकर कुकडे यांची या बैठकीतील उपस्थिती सर्वांची लक्षवेधी ठरली. मधुकर कुकडे यांनी या बैठकीला लावलेली उपस्थिती म्हणजेच प्रफुल्ल पटेल यांना हा जबर धक्का मानला जातोय.

‘भडारा-गोंदियाच्या नेत्याचा अहंकार उतरवायचाय’, कुकडे यांचा पटेलांवर निशाणा

“अहंकार कुणाला आहे हे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या जनतेला माहिती आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या नेत्याचा अहंकार उतरवायचा आहे”, असं म्हणत मधुकर कुकडे यांनी नाव न घेता प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला. “शरद पवार यांच्याशी माझे जुने संबंध आहे, आणि त्यांच्या विचारानेचं महाराष्ट्र पुढे जाणार आहे. शरद पवार हे जगातील पहिले नेते आहेत ज्यांनी शेतकऱ्यांचे 70 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केलं आहे. शरद पवार कृषीमंत्री असताना खताचे भाव वाढले नाहीत. मात्र, आज शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. त्यामुळेच त्यांच्या विचारधारेसोबत आहे”, अशी भूमिका मधुकर कुकडे यांनी मांडली.

‘गनिमी काव्याप्रमाणे प्रफुल्ल पटलांसोबत होतो’

“शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारणीत आजही मी कार्यरत आहे. महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार राहील त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहून त्याला विजयी करू. शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याप्रमाणे प्रफुल्ल पटलांसोबत होतो”, असा खुलासा यावेळी मधुकर कुकडे यांनी केला.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.