Bhandara SDO attack case | भंडाऱ्यातील एसडीओ हल्ला प्रकरणी शिवसेना आक्रमक; आमदार भोंडेकर म्हणतात, पोलीस अधीक्षकांना हटवा
वाळू तस्करी अणि पोलीस कर्मचारी यांच्या मटन पार्टीची वसंत जाधव यांनी गंभीर दखल घेतली आहे. पार्टीत सामील झालेल्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. त्यानंतर पार्टी दरम्यान पोलीस हवालदाराच्या धावडेच्या 'त्या' वक्तव्याची चौकशी होणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली आहे.
भंडारा : उपविभागीय अधिकारी यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणातला आमदार भोंडेकर ( MLA Narendra Bhondekar) यांनी पवनी पोलीस निरीक्षक गायकवाड यांना निलंबित करण्याची मागणी धरली आहे. भोंडेकर म्हणाले की, पवनीचे वाळू माफिया यांच्यासोबत पोलीस निरीक्षकांचे साटेलोटे असताना या प्रकरणाची चौकशी त्यांनाच देण्यात आली. इतकेच नव्हे तर आता ज्यांनी पोलीस कर्मचारी अणि आरोपींसोबत मटण पार्टीचा व्हिडीओ काढला आहे, त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. कारण आता आरोपीच नव्हे तर पोलीस विभाग सुद्धा त्याच्या शोधात निघाले आहेत. त्याचे काही कमी जास्त झाले तर याकरिता संपूर्ण जबाबदार हे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (District Superintendent of Police) वसंत जाधव असतील, असा आरोप आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केला आहे. त्यामुळं पोलीस अधीक्षकांना हटविण्यात यावे, यासाठी शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे (Collector) तक्रार दिली आहे.
तीन पोलीस कर्मचारी निलंबित
दरम्यान, भंडारा उपविभागीय अधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणात आरोपीला पकडण्यास गेलेले पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपी सोबत मटन पार्टी दरम्यान झालेल्या वक्तव्याची चौकशी होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली. घटनेच्या तिसर्या दिवशी वसंत जाधव यांनी प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला. वाळू तस्करी अणि पोलीस कर्मचारी यांच्या मटन पार्टीची वसंत जाधव यांनी गंभीर दखल घेतली आहे. पार्टीत सामील झालेल्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. त्यानंतर पार्टी दरम्यान पोलीस हवालदाराच्या धावडेच्या ‘त्या’ वक्तव्याची चौकशी होणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली आहे.
ट्रॉफिक शिपाई सोबत कसा गेला?
धावडे ने “तुमचा किरकोळ विषय आहे. तुमसर पोलीस स्टेशनला असताना अनेक आरोपींचे नाव उडवले आहेत, असे वक्तव्य केले होते. त्याकरिता याची चौकशी साकोली उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडं देण्यात आली आहे. सोबतच आरोपीला पकडायला जाण्याकरिता ट्रॅफिकचा शिपाईसोबत कसा गेला, याची पण चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी या वेळी दिली. आता तुमसर पोलीस स्टेशनला किती आरोपींची नावे उडविली आहेत. त्याची चौकशी झाल्यावर आणखी बडे अधिकारी गोत्यात येण्याची शक्यता आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक जाधव यांना हटवा
उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्यावर वाळू माफियांनी केलेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणी शिवसेनेनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. रेती माफियांना व इतरही अवैध व्यवसाय करणा-यांना पाठीशी घालून कायदा सुव्यवस्थेची वाट लावणा-या जिल्हा पोलीस अधीक्षकांना तात्काळ हटवा अन्यथा सोमवारला तीव्र आंदोलन करू असा इशारा निवेदनातून देण्यात आला. घटनेच्या दुस-या दिवशी आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी थेट आरोपींसोबतच मटन पार्टी केल्याचा व त्यात गुन्हेगारांना वाचविण्याचे आश्वासन दिल्याचा व्हिडीओ लोकांमध्ये व माध्यमांमध्ये पसरल्याने पोलिसांवरचा लोकांचा विश्वास उडाला आहे. महसूल खात्यातील एका बड्या अधिका-याचे संरक्षण पोलीस विभाग करीत नसेल तर सर्वसामान्यांच्या जीविताच्या रक्षणाची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे.