वीस वर्षीय तरुणी गेली ती परतलीच नाही, तिच्याबाबत नेमकं काय घडलं?
त्यानंतर तिचा मृतदेह पुरल्याचा अंदाज आहे. अद्याप तिचा मृतदेह सापडला नाही. त्यामुळे पोलिसांनी आता शोधमोहीम सुरू केली आहे.
तेजस मोहतुरे, प्रतिनिधी, भंडारा : दृश्यम चित्रपटात एका युवकाचा मृतदेह आधी घरात पुरला जातो. त्यानंतर अजय देवगण (हिरो) त्या मृतदेहाची विल्हेवाट पोलीस ठाण्याच्या बांधकामात करतो. मृत युवक त्यांच्या घरी गेल्याचे दिसते. पण, त्यानंतर काय झाले हे कळत नाही. अशीच काहीशी स्टोरी कवलेवाडा परिसरात घडली. चार वर्षांपूर्वी मुलगी बेपत्ता झाली. ती बोरकर नामक व्यक्तीच्या घरी गेली. इथपर्यंत पोलिसांना माहिती मिळाली. पण, त्यानंतर तिचा मृतदेह पुरल्याचा अंदाज आहे. अद्याप तिचा मृतदेह सापडला नाही. त्यामुळे पोलिसांनी आता शोधमोहीम सुरू केली आहे.
गळफास लावलेल्या स्थितीत आढळलेल्या तरुणीच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. याप्रकरणी तिघांना भंडारा पोलिसांनी अटक केली. गोबरवाही पोलीस स्टेशनच्या हद्दीत कवलेवाडा येथील ही घटना आहे. सदर तरुणी चार वर्षांपासून बेपत्ता होती.
आता या घटनेचे बिंग फुटले. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. संजय बोरकर (वय 47), राजकुमार बोरकर (वय 50), धरम सयाम (वय 52) असं अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. या आरोपींकडून पोलीस माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, त्यांच्याकडून काही सुगावा लागत नाही. त्यामुळे पोलिसांसमोर मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.
अद्याप पुरावा सापडला नाही
पोलीस अधीक्षक लोहित मतानी म्हणाले, गोबरवाही पोलीस हद्दीतील कवलेवाड्याची २० वर्षीय मुलगी घरून निघाली. ती बोरकर नावाच्या व्यक्तीच्या घरी गेली. त्यानंतर तिच्यासोबत काय घडले. याचा अद्याप पुरावा मिळाला नाही. पण, त्यानंतर तिचा मृतदेह चिखलामाईन्स परिसरात पुरल्याचा अंदाज आहे.
आरोप कसे सिद्ध होणार
भंडारा एलसीबी आणि गोबरवाही पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. बयानावरून प्रथमदर्शनी गुन्हा झाला आहे. तीन आरोपी अटक करण्यात आली आहे. चिखलामाईन्स तिचा मृतदेह पुरल्याचे सांगितले जाते. मृतदेह मिळाले नाही. शोध सुरू आहे. दुसरे आरोपी मर्डर करण्यामध्ये किंवा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कुणी मदत केली का, या दिशेनेही तपास सुरू आहे. या खून प्रकरणाने पोलिसांसमोर आरोप सिद्ध करणे कठीण झाले आहे.