Video – Bhandara | चोराने मंदिराचे कुलूप तोडले, दानपेटीतील रक्कम लंपास केली, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
परसोडी गावातील मानव मंदिराच्या दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला चढवला. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. चोरांचा शोध लावण्याचे आवाहन आता पोलिसांसमोर आहे.
तेजस मोहतुरे
भंडारा : भंडारा तालुक्यातील परसोडी गावात मानव मंदिर (Manav Mandir) आहे. येथील दानपेटीवर चोरांनी डल्ला मारला. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. परमात्मा एक सेवक यांनी परसोडी (Parsodi) गावामध्ये एक मानव मंदिर (Paramatma Sevak) तयार केला. या मानव मंदिरामध्ये येणारे भाविक त्या दानपेटीमध्ये पैसे टाकत होते. वर्षभरापासून ही दानपेटी उघडली नव्हती. याचाच फायदा घेत रात्रीच्या अंधारामध्ये चोरट्यांनी मंदिराचा गेट तोडला. मंदिरात प्रवेश केला. दानपेटी लंपास केली. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. जवाहरनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
पाहा व्हिडीओ
— Govind Hatwar (@GovindHatwar) February 13, 2022
सीसीटीव्ही कुठे कुठे लावणार?
चोरांना कशाचीही भीती राहिली नाही. ते मंदिरातही चोरी करायला मागेपुढं पाहत नाही. मानव मंदिरातच चोरी केल्याने चोरांचा आता काही भरोसा राहिला नाही, अशी चर्चा सुरू झाली. घरासमोरही सीसीटीव्ही लावता येईल का याचा विचार करणे गरजेचे झाले आहे. सीसीटीव्हीमुळं चोराचा पत्ता लावता येणे सहज शक्य आहे. पोलीसही यासाठी आग्रही आहेत. पण, सीसीटीव्ही लावण्यासाठी खर्च येतो. तो सगळ्यांनाच परवडण्याजोगे नाही. त्यामुळं मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही असणे गरजेचे झाले आहे.