भंडाऱ्यात भरधाव ट्रकची दुसऱ्या ट्रकला धडक, चेंदामेंदा झालेल्या केबिनमध्ये चालक अडकला

भंडारा जिल्ह्यातील सालाई खुर्द-उसर्रा येथे उभ्या ट्रकला भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात चेंदामेंदा झालेल्या ट्रकच्या कॅबिनमध्ये फसून चालक गंभीर जखमी झाला. या अपघातामुळे तब्बल तीन तास वाहतूक विस्कळीत राहिली.

भंडाऱ्यात भरधाव ट्रकची दुसऱ्या ट्रकला धडक, चेंदामेंदा झालेल्या केबिनमध्ये चालक अडकला
Follow us
| Updated on: May 26, 2024 | 7:59 PM

राज्यात सध्या अपघाताच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर भरधाव एसटी बसने ट्रकला धडक दिल्याची बातमी ताजी असताना भंडाऱ्यात एका ट्रकने उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत गाडीच्या पुढच्या भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला असून कॅबिनमध्ये फसलेला चालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे सलग 3 तास वाहतूक खोळंबलेली राहिली.

भंडारा जिल्ह्यातील सालाई खुर्द-उसर्रा मार्गावर कोळशाची वाहतूक करणारा ट्रक राष्ट्रीय महामार्गालगत उभा होता. यावेळी या ट्रकला पाठीमागून भरधाव आलेल्या सिमेंटची वाहतूक करणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सिमेंटची वाहतूक करणाऱ्या ट्रकची कॅबीन पूर्णतः चेंदामेंदा झाल्याने त्यात अडकून चालक गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात भंडारा-रामटेक राष्ट्रीय महामार्गावरील सालई खुर्द-उसर्रा गावाजवळ घडला.

तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर जखमी चालकाला बाहेर काढण्यात यश आलं. त्याला उपचारासाठी तुमसर येथे दाखल करण्यात आले. दरम्यान, या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तीन तासापर्यंत खोळंबली होती. अपघातग्रस्त ट्रकला दूर केल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

धुळ्यात अपघातात तरुणाचा मृत्यू

दरम्यान, धुळे शहरातील देवपूर भागात एलएम सरदार शाळेजवळ एक अपघाताची घटना घडली आहे. या ठिकाणी एक दुचाकी चालकाला भरधाव बसने धडक दिली. या अपघातात 20 वर्षीय दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर घटनास्थळी जमलेल्या जमावाने ट्रकवर दगडफेक केली. घटनास्थळी मोठा जमाव जमल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ट्रक जप्त करत घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलीस या प्रकरणी आता पुढील तपास करत आहेत.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.