Bhandara Fighting : भंडाऱ्यात कैद्यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी, जिल्हा कारागृहातील घटना

भंडारा कारागृहातील कारागृह सुभेदार न्यायाधीन बंध्याना कारागृहातील उपहार गृहात वस्तू खरेदी करण्यासाठी घेऊन जात होते. यावेळी मोक्कामधील आरोपी कैदी श्याम उर्फ पिटी चाचेरे, शाहरुख रज्जाक शेख यांचे दुसरा मोक्कातील आरोपी कैदी शुभम चव्हाण याच्यासोबत भांडण झाले. दरम्यान झालेल्या तिघाच्या भांडणात इतर 5 आरोपीही सहभागी झाल्याने मोठी हाणामारी झाली.

Bhandara Fighting : भंडाऱ्यात कैद्यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी, जिल्हा कारागृहातील घटना
भंडाऱ्यात कैद्यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 6:43 PM

भंडारा : कारागृहातील उपहार गृहात खरेदी दरम्यान झालेल्या क्षुल्लक वादा (Minor Dispute)त कैद्यांच्या दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी (Fighting) झाल्याची घटना भंडारा जिल्हा कारागृहात घडली आहे. या प्रकरणी जिल्हा कारागृह अधीक्षक यांच्या तक्रारीवरुन भंडारा शहर पोलिसात 8 कैद्यांविरोधात गुन्हा (FIR) नोंद करण्यात आला आहे. श्याम उर्फ पिटी चाचेरे (40), शाहरुख रज्जाक शेख (30), शुभम चव्हाण (32), गौतम चव्हाण (27), विजय तरोने (30), प्रथम मेश्राम (27), मुकेश रावते (32), इमरान शेख (33) असे गुन्हा नोंद करण्यात आलेल्या कैद्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे मारहाणी करण्यात मोक्काच्या आरोपींचा समावेश आहे. याप्रकरणी पुढील कारवाई भंडारा शहर पोलिस करत आहेत.

क्षुल्लक कारणावरुन कैद्यांमध्ये मारहाण

भंडारा कारागृहातील कारागृह सुभेदार न्यायाधीन बंध्याना कारागृहातील उपहार गृहात वस्तू खरेदी करण्यासाठी घेऊन जात होते. यावेळी मोक्कामधील आरोपी कैदी श्याम उर्फ पिटी चाचेरे, शाहरुख रज्जाक शेख यांचे दुसरा मोक्कातील आरोपी कैदी शुभम चव्हाण याच्यासोबत भांडण झाले. दरम्यान झालेल्या तिघाच्या भांडणात इतर 5 आरोपीही सहभागी झाल्याने मोठी हाणामारी झाली. लाथा बुक्क्यांनी एकमेकांना मारहाण सुरु केली. लागलीच कारागृहातील पोलिसांनी धाव घेत दोन्ही गटातील भांडण सोडवत जखमींवर प्रथमोपचार केले. दरम्यान भंडारा जिल्हा कारागृह अधीक्षक यांच्या तक्रारीवरुन 8 आरोपी कैद्यांविरुद्ध भंडारा शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास भंडारा शहर पोलिस करीत आहेत.

याआधीही भाजीवरुन झाली होती मारामारी

काही दिवसांपूर्वी भंडारा कारागृहात जेवणात भाजी कमी दिल्याच्या कारणातून कैद्यांमध्ये हाणामारी झाली होती. याप्रकरणी चार कैद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कैदी देवेंद्र राउत सकाळचे आहार वाटप करत असताना कैदी क्रमांक 4 शेख रफीक शेख रहमानने देवेंद्र यांच्याकडे जास्त भाजी मागितली. मात्र देवेंद्र यांनी नकार दिल्याने आरोपीचे त्यांच्यासोबत भांडण झाले. यावेळी आरोपीच्या मदतीला इतर 3 कैदी आल्याने देवेंद्र राऊत जखमी झाले. संबंधित घटनेची माहिती मिळताच कारागृह पोलिसांनी कैदी देवेंद्र राऊत यांची मारहाण करणाऱ्या आरोपी कैद्यांच्या तावडीतून सुटका केली. (Violent fight between two groups of inmates at Bhandara District Jail over minor dispute)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.