Narendra Bhondekar : मातोश्रीच्या नव्हे जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलो, नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाला सुनावले

आजच्या संपादकीय लेखामध्ये एकनाथ शिंदेच्या बंडाला स्वातंत्र्याचे बंड न म्हणता खाजगी बंड म्हटलं आहे. यावेळी सामनाला कोण लिहितो सर्व जगाला माहीत असल्याचा उपरोधक टोला संजय राऊतांना यावेळी नरेंद्र भोंडेकर यांनी लगावला.

Narendra Bhondekar : मातोश्रीच्या नव्हे जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलो, नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाला सुनावले
नरेंद्र भोंडेकर
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 4:58 PM

भंडारा : राजकीय बंडानंतर (State Rebellion) आमदार आपल्या विधानसभा क्षेत्रात पोहचले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यांच्या विरोधात शिवसैनिक घोषणाबाजी करत होते. पण, मुख्यमंत्री झाल्यापासून हा विरोध आता कमी झाला. भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे गुवाहाटीला गेले होते. शिंदे समर्थक गटात होते. तेव्हा स्थानिक शिवसैनिकांनी (Shiv Sainik) त्यांचा विरोध केला होता. पण, आता ते भंडाऱ्यात परतले. त्यावेळी त्यांनी ठाकरे गटातील शिवसेना आणि सामनातील संपादकीयवर (Editorial) टीका केली. नरेंद्र भोंडेकर म्हणाले, मातोश्रीच्या आशीर्वादाने आमदार झालो असतो तरं सर्वच आमदार निवडून आले असते. सामना कोण लिहितो साऱ्या जगाला माहीत आहे. त्यामुळं त्यात काय लिहिलंय. त्याच्या खोलात जाण्याची गरज नाही. शिवाय एकनाथ शिंदे यांना मुख्य प्रक्रियेतून डावलले होते, याची सुध्दा खंत नरेंद्र भोंडेकर यावेळी व्यक्त केली. स्थानिक कार्यकर्ते भोंडेकर यांना भेटायला आले होते. आता भाजप-शिवसेना सरकार सामान्य जनतेचे प्रश्न सोडवेल, असा विश्वास भोंडेकर यांनी व्यक्त केला.

अडीच वर्षांपासून रखडलेली कामं मार्गी लागतील

मातोश्रीच्या आशीर्वादाने आमदार झालो असतो तर सर्वच आमदार निवडून आले असते, असा खोचक टोला भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी लगावला. महाराष्ट्रातील राजकीय सत्ता नाट्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भोंडेकर यांनी समर्थन दिलं. भंडारा जिल्ह्यातील अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर आता जिल्ह्यात परतले. घडलेल्या राजकीय घडामोडी बाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. शिंदे-फडणवीस सरकार जनतेची काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदारांची कामं मागील अडीच वर्षापासून होत नव्हती. एकनाथ शिंदे यांना मुख्य प्रक्रियेतून डावलेची सुध्दा खंत यावेळी व्यक्त केली.

काम करणारेच निवडून येतात

मातोश्रीमुळे हे बंडखोर आमदार निवडून आल्याच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्ही जनतेच्या आशीर्वादामुळे निवडून आल्याचे भोंडेकर म्हणाले. शेवटी काम करणारेच लोक निवडून येतात. लोकं काम करणाऱ्याच्याच बाजूने उभे असल्याचे त्यांनी सांगितलं. ज्यांना आम्हाला निवडून आणल्याचे क्रेडिट घ्यायचे असेल तर त्यांनी खुशाल घ्यावे. जर मातोश्रीच्या आशीर्वादाने आमदार निवडून आले असते तर मातोश्रीची पूजा करून सर्वच आमदार निवडून आले असते, असा खोचक टोला त्यांनी लगावला. दुसरीकडे भोंडेकर यांनी सामनाच्या संपादकीय लेखाची आज खिल्ली उडवली.

हे सुद्धा वाचा

सामनाचे संपादकीय कोण लिहितो सर्वांनाच माहीत

आजच्या संपादकीय लेखामध्ये एकनाथ शिंदेच्या बंडाला स्वातंत्र्याचे बंड न म्हणता खाजगी बंड म्हटलं आहे. यावेळी सामनाला कोण लिहितो सर्व जगाला माहीत असल्याचा उपरोधक टोला संजय राऊतांना यावेळी नरेंद्र भोंडेकर यांनी लगावला. काल एकनाथ शिंदे यांनी सभागृहात ठाकरे गटावर टोलेबाजी केली. त्यानंतर अपक्ष आमदार भोंडेकर यांनी सुद्धा आज ठाकरे गटावर तुफान टोलेबाजी केली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.