Bhushansiha Holkar : ‘होळकर इंग्रजांना घाबरले’, या वक्तव्यावर होळकर खवळले, थेट ब्रिगेडला इशारा, वाघ्या कुत्र्यावर रोखठोक भूमिका
"संभाजी ब्रिगेड अशा संघटनांना आळा घालावा. मी घराण्याचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय कुठल्याही राजकीय पक्ष्याचा प्रतिनिधी म्हणून नाही. आमच्या घराण्याने निधी दिलाय. त्याचं क्रेडिट दिलं पाहिजे. चुकीचा प्रकार घडला तर संभाजीराजेना आमचा विरोध असेल. मागे प्रकार झाला तसा घडला नाही पाहिजे. लक्ष्मण हाके यांची भूमिका काय आहे ते लक्ष्मण हाके यांना विचारा. मुख्यमंत्र्यांनी विरोधात आणि समर्थनात असणाऱ्या इतिहास संशोधकांची समिती नेमावी. होळकरांची बदनामी कोणीही करू नये. अहिल्यादेवींच्या जयंतीला गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका" असं भूषणसिंह राजे होळकर म्हणाले.

“मागच्या दोन महिन्यात महाराष्ट्रात लोकांच्या प्रश्नापेक्षा ऐतिहासिक मुद्यांवर भर देण्याचे काम सुरू आहे. यामुळे समाज एकमेकाविरोधात उभा राहत आहे. मागे औरंगजेबाच्या समाधीचा विषय झाला. आता ताज्या परिस्थितीत रायगड येथील वाघ्या कुत्र्याचा विषय. रायगड येथे असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचा विषय हा कोणत्या एका जातीचा किंवा समाजाचा नाही. दुर्देवाने महाराष्ट्रात प्रत्येक विषयाला जातीय वळण दिले जाते. मी आमच्या घराण्याची भूमिका मांडण्यासाठी आलोय” असं भूषणसिंह राजे होळकर म्हणाले. “शिवाजी महाराजांनी कर्तुत्वाच्याजोरावर माणसं निवडली. वाघ्या कुत्र्याचा अस्तित्व होतं की नव्हतं, यावर मी काही बोलणार नाही” असं भूषणसिंह राजे होळकर म्हणाले.
“लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, म्हणून महाराष्ट्र शासन यांना मला विनंती करायची आहे, शासनाने पुढाकार घेऊन समिती नेमवी. दोन्ही बाजू ऐकून घ्याव्यात. दोन्ही बाजू इतिहास अभ्यासकांना समोरासमोर घेऊन ऐकल्या पाहिजेत. होळकरांनी रायगडावरील शिव स्मारकासाठी देणगी दिली. त्या स्मारकाबद्दल आमच्या भावना आहेत. कुणाच्या भावना दुखावणार नाहीत या दृष्टीने विचार व्हावा” असं भूषणसिंह राजे होळकर म्हणाले. “काल एका पत्रकार परिषदेत ऐकलं, होळकर इंग्रजांना घाबरत होते. मात्र इंग्रजांबरोबर कधी होळकरांनी सेटलमेंट केलेली नाही. असं वक्तव्य करणाऱ्यांचा किती इतिहासाचा अभ्यास आहे हे पहावं लागेल. भारतात सगळ्यात शेवटपर्यंत इंग्रजांविरोधात कोणी लढा दिला असेल, तर ते महाराज यशवंतराव होळकर होते” असं भूषणसिंह राजे होळकर म्हणाले.
‘कोणाचा अजेंडा चालू देणार नाही’
“होळकरांनी सर्व समाजासाठी काम केलं. साताराचे छत्रपती अजिंक्यतारावर बंधनात होते, तेव्हा होळकरांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. वाघ्या कुत्र्याच्या प्रकरणाला जातीय वळण न लावता मार्ग निघाला पाहिजे” असं भूषणसिंह राजे होळकर म्हणाले. “तुकोजी राजे होळकरांनी अनेक विद्यापीठांना आणि शिवस्मारकांना निधी दिला. यामध्ये कोणाचा राजकीय हेतू असेल तर माझा इशारा आहे कोणाचा अजेंडा चालू देणार नाही. 31 मे रोजी अहिल्याबाई होळकर यांची 300 जयंती आहे. यावेळी कोणतही गालबोट लागू नये याची काळजी घ्यावी” असं भूषणसिंह राजे होळकर म्हणाले.
‘ब्रिगेडला इशारा’
“होळकर शेवटपर्यंत इंग्रजांसोबत लढले. चुकीचे वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही. ब्रिगेडला माझा इशारा आहे. तुकोजी महाराज होळकर यांचा रायगडावर फलक लावावा” अशी मागणी भूषणसिंह राजे होळकर यांनी केली. “रायगडावर शिव स्मारकासाठी तुकोजी महाराजांनी निधी दिलाय, त्याचा नोंदी आहेत. होळकरांनी स्वतःच्या कुत्र्याची समाधी रायगडावर का बांधली असती?. या सगळ्या गोष्टी कथा आहेत ते इंग्रजांना घाबरत होते किंवा आणखी काही. वाघ्याची अडचण आहे की, तुकोजी महाराज होळकर यांनी निधी दिला याची अडचण आहे. तुकोजी महाराज होळकर यांचा रायगडावर फलक लावावा” अशी मागणी भूषणसिंह राजे होळकर यांनी केली.
‘महाराष्ट्रात प्रत्येक विषयात जात इन्व्हॉल केली जाते’
“महाराष्ट्रात प्रत्येक विषयात जात इन्व्हॉल केली जाते. आमच्या समाजाची अस्मिता त्या स्मारकाशी जुळलेल्या आहेत. वाघ्या प्रकरणावर इतिहास अभ्यासक बोलतील. होळकरांनी निधी दिल्याच्या नोंदी आहेत. संभाजी राजेंनी भूमिका घेतलीय. मात्र वाघ्याची अडचण आहे की, होळकरांनी निधी दिलाय याची अडचण आहे? वाघ्या होता की, न्हवता हे आम्ही ठरवू शकत नाही. त्यातील तथ्य पहावं. समाजात तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. होळकरांनी शिवाजी महाराजांसाठी निधी दिलाय” असं भूषणसिंह राजे होळकर म्हणाले.