‘एसआरए’बाबत मोठा निर्णय, निष्कासित झोपडी तीन वर्षांनी विकता येणार; जितेंद्र आव्हाडांची माहिती

एसआरएबाबत (SRA) आज महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार आता झोपडी  निष्कासित झाल्यानंतर ती त्यानंतर तीन वर्षांनी विकता येणार आहे. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी माहिती दिली आहे. लाखो गरीब लोकांना याचा फायदा होणार असल्याचे  आव्हाड यांनी म्हटले आहे.

'एसआरए'बाबत मोठा निर्णय, निष्कासित झोपडी तीन वर्षांनी विकता येणार; जितेंद्र आव्हाडांची माहिती
घर विकताना सोसायटीच्या NOC ची गरज नाहीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 8:26 PM

मुंबई : एसआरएबाबत (SRA) आज महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार आता झोपडी  निष्कासित झाल्यानंतर ती त्यानंतर तीन वर्षांनी विकता येणार आहे. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी माहिती दिली आहे. लाखो गरीब लोकांना याचा फायदा होणार असल्याचे  आव्हाड यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना आव्हाड यांनी म्हटले की, आज ‘एसआरए’बाबत एक महत्तपूर्ण आणि चांगला निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता झोपडी निष्कासित (hut evacuat) झाल्यानंतर तीन वर्षांनी ती विकता येणार आहे. याचा फायदा गोरगरीब जनतेला होणार आहे. तसेच सशुक्ल घर विकत घेण्याचा दर अडीच लाख रुपये ठरवण्यात आला आहे. यामुळे गरिबांना आपल्या हक्काचे घर घेण्यास मदत होणार आहे. विरोधकांना काय टिका करायची ती करू द्या, सद्या महाविकास आघाडी सरकार उत्तम काम करत असल्याचे देखील यावेळी आव्हाडांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी  बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले आव्हाड?

महाविकास आघाडी सरकारच्या वाईन धोरणाविरोधात बोलताना कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. बंडातात्या कराडकर यांच्या या वक्तव्यावर आता राज्यभरात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपसह सर्वच पक्षाच्या महिला नेत्यांनी बंडातात्या यांच्यावर जोरदार टीका केलीय. तसंच त्यांनी माफी मागावी अशी मागणीही करण्यात येत आहे. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारु पितात, असं वक्तव्य बंडातात्या यांनी केलं होतं. आता यावर जितेंद्र आव्हाड  यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. एका किर्तनकाराच्या तोंडात या प्रकारची भाषा शोभत नसल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. बंडातात्या हे त्यांच्यावर असलेल्या संस्कारासारखे बोलले, ते वारकरी आहेत की नाही हे तपासून पहाण्याची गरज असल्याची टीका आव्हाड यांनी केली आहे.

केंद्रावर निशाणा

दरम्यान यावेळी बोलताना आव्हाड यांनी केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपावर देखील निशाणा साधला आहे. गेलया सहा ते सात वर्षांत मोठ्या प्रमाणात आर्थिक नाकेबंदी झा्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. गेल्या सहा ते सात वर्षांत मोठ्याप्रमाणात आर्थिक नाकेबंदी झाली होती. मात्र आम्ही असे काही निर्णय घेतले ज्याचा फायदा बिल्डरांसह सामान्य जनतेला झाला. ज्या योजना बंद करण्यात आल्या होत्या त्या पुन्हा सुरू करण्याचा विचार असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

पुन्हा अमृता फडणवीसांच्या ट्विटवरून महिला नेत्यांची जुंपली, रुपाली पाटील-श्वेता महाले आमनेसामने

Video : बंडातात्या कराडकर यांचं सुप्रिया सुळे, पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य! आता माफी मागायलाही तयार

पुन्हा राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी, निवृत्त अधिकारी नियुक्तीवरही राज्यपाल कायदेशीर सल्ला घेतील – नवाब मलिक

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.