मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपात हालचालींना वेग, शिंदे गटातही खल, कार्यकारिणीच्या बैठकीत मोठा निर्णय

| Updated on: Nov 23, 2024 | 9:43 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या विजयानंतर भाजपात मुख्यमंत्री निवडीसाठी मोठ्या हालचालींना वेग आला आहे. विधीमंडळ नेता निवडीसाठी दिल्लीतून 2 निरीक्षक पाठवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपात हालचालींना वेग, शिंदे गटातही खल, कार्यकारिणीच्या बैठकीत मोठा निर्णय
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस
Follow us on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महायुतीच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या विजयानंतर भाजपात मुख्यमंत्री निवडीसाठी मोठ्या हालचालींना वेग आला आहे. विधीमंडळ नेता निवडीसाठी दिल्लीतून 2 निरीक्षक पाठवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय भाजपकडून 2 निरीक्षक राज्यात पाठवले जाणार आहेत. विधीमंडळ नेता निवडीनंतरच भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. भाजपची उद्या महत्त्वाची बैठक पार पडण्याची शक्यता आहे. भाजप पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतही आज मोठ्या हालचाली घडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिवसेनेच्या कार्यकारिणीची आज बैठक पार पडल्याची माहिती आहे.

शिवसेनेत काय ठरलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतही निकालानंतर मोठ्या घडामोडी घडल्या. विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक आज मुख्यमंत्री तथा पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत मित्र पक्षासोबत चर्चा करण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

शिवसेनेच्या आमदारांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांनी मित्र पक्षासोबत चर्चा करण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा प्रस्ताव मांडला. तर सिद्धेश कदम यांनी शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गट नेते, मुख्य प्रतोद, प्रतोद आणि इतर नेत्यांची निवड करण्याचे सर्वांधिकार मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना देण्याचा प्रस्ताव मांडला. या बैठकीला ऑनलाईन उपस्थित असलेले आमदार आणि कार्यकरिणीतील इतर सर्व सदस्यांनी या दोन्ही प्रस्तावांना अनुमोदन देऊन याबाबतचे सर्वांधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय एकमताने घेतला.

हे सुद्धा वाचा

धाराशिव जिल्ह्यात फिप्टी – फिप्टी; दोन मविआ तर दोन महायुतीचे उमेदवार विजयी

दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभेसाठी महाविकास आघाडीचे दोन तर महायुतीचे दोन उमेदवार निवडून आले आहेत. परंडा विधानसभा मतदारसंघातून शेवटच्या फेरीत तानाजी सावंत विजयी झाले. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांचा १५०९ मतांनी पराभव केला. तर तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे राणाजगजितसिंह पाटील ३६ हजार मतांच्या फरकांनी विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे धीरज पाटील यांच्यावर एकतर्फी विजयी मिळवला आहे. उस्मानाबाद विधानसभा मतदारातून ठाकरे गटाचे कैलास पाटील तर उमरगा मतदारसंघांतून प्रविण स्वामी विजयी झाले आहेत. गेले तीन टर्म आमदार असलेल्या ज्ञानराज चौगुले यांचा स्वामी यांनी पराभव केला आहे.