Video| सांगली शहरात गव्याचा मुक्तसंचार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
काही दिवसांपासून सांगलीच्या सीमावर्ती भागामध्ये गव्याचा मुक्तसंचार सुरू होता. अखेर हा गवा शहरात येऊन धडकला आहे. गवा मुक्तपणे शहरात फीरत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सांगली : काही दिवसांपासून सांगलीच्या सीमावर्ती भागामध्ये गव्याचा मुक्तसंचार सुरू होता. अखेर हा गवा शहरात येऊन धडकला आहे. गवा मुक्तपणे शहरात फीरत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली असून, गव्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्यापही या गव्याला जेरबंद करण्यात यश आलेले नाही. शहरात रात्रभर या गव्याचा मुक्तसंचार सुरू होता.
तीन दिवसांपासून सीमावर्ती भागात
गेल्या तीन दिवसांपासून सांगलीच्या सीमावर्ती भागामध्ये एक गवा फिरत होता. अनेक नागरिकांना या गव्याचे दर्शन झाले होते. मात्र मंगळवारी हा गवा अचानक शहरात दाखल झाला. हा गवा रात्रभर सांगलीतल्या प्रमुख मार्गावर फिरत राहिला. पहाटेच्या सुमारास हा गवा सांगलीच्या मार्केट यार्ड परिसरात दाखल झाला. गवा अचानक पुढ्यात आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले. या गव्याला पहाण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. हा गवा टिळक चौक मार्गे शहरात घुसला, त्यानंतर तो वखार भाग, कॉलेज कॉर्नर मार्गे सकाळी मार्केट यार्ड परिसरात आला.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
दरम्यान या घटनेची माहिती वनविभागाला देखील देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, नागरिकांच्या मदतीने या गव्याला सुरक्षीत अधिवासात सोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या वन्य प्राणी मनुष्यवस्तीत येण्याचा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यापूर्वी देखील पुण्यात आणि कोल्हापूरमध्ये भरवस्तीत गव्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर आता सांगलीत देखील गवा आल्याने खळबळ उडाली आहे.
संबंधित बातम्या
रोहित शर्मामुळे ODI टीमचं सिलेक्शन पुढे ढकललं, 4 वर्षांनंतर दिग्गज खेळाडूचं पुनरागमन
सब्र का फल मीठा होता है..! शेतकऱ्यांच्या एका निर्णयामुळे बदलले कापूस खरेदी केंद्रावरील चित्र