शहापूरनंतर वसईत बर्ड फ्ल्यूने चिंतेचे वातावरण, 2 हजार कोंबड्या नष्ट; चिकन खवय्ये घाबरले
मागील आठवड्यापासून अर्नाळा, आगाशी, बोळींज परिसरातील काही भागात अचानक संशयास्पद कोंबडय़ांचा मृत्यू झाला आहे. तसेच त्या परिसरातील कोंबड्या मरत असल्याचे लोकांचे लक्षात आले त्यानंतर अनेकांनी जिल्हा पशुसंवर्धन विभागाला दिली
वसई – मागच्या आठवड्यात शहापूर (shahapur) शहरात बर्ड फ्ल्यू (bird flu) झालाच्या अनेक कोंबड्या आढळल्या होत्या. त्यावेळी देखील तिथल्या कोंबड्या जवळच्या एका निर्जनस्थळी नेऊन त्यांना जिल्हा पशुसंवर्धन विभागाने नष्ठ केल्या होत्या. त्यावेळी तिथल्या परिसरातील लोकांमध्ये सुध्दा अधिक घबराहट पसरली होती. आता वसईमध्ये (vasai) सुध्दा बर्ड फ्ल्यू झाल्याचं निदान झाल्यापासून तिथल्या पशुसंवर्धन विभागाकडून चांगलीच काळजी घेत असल्याचे समोर आले आहे. कोंबड्या तडफडून मरत असल्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्याचं निदान करण्यात आलं त्यामध्ये त्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर आता पशुसंवर्धन विभागाकडून निदान झालेल्या 2 हजाराच्या वर कोंबड्या नष्ट केल्याचं समजतंय. त्याचबरोबर दोन हजार कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याचे समजताच तिथल्या अनेक चिकन खवय्ये घाबरले असल्याची माहिती देखील मिळत आहे. विशेष म्हणजे माहिती मिळताच जिल्हा पशुसंवर्धन विभागाने शनिवारी शोध मोहीम राबवत 1 किलोमीटरच्या परिसरात 2 ते 3 हजार मृत कोंबड्या ताब्यात घेऊन त्या नष्ट केल्या आहेत.
तडफडून कोंबड्या मरत असल्याने केली चाचणी
मागील आठवड्यापासून अर्नाळा, आगाशी, बोळींज परिसरातील काही भागात अचानक संशयास्पद कोंबडय़ांचा मृत्यू झाला आहे. तसेच त्या परिसरातील कोंबड्या मरत असल्याचे लोकांचे लक्षात आले त्यानंतर अनेकांनी जिल्हा पशुसंवर्धन विभागाला दिली. शहापूरमध्ये असं प्रकरण घडल्याने त्यांनी तात्काळ कोंबड्यांची चाचणी करण्याचं ठरवलं. परंतु त्यांना चाचणी केल्यानंतर मेलेल्या कोंबड्या बर्ड फ्ल्यूच्या बळी ठरल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ तिथल्या परिसर ताब्यात घेतला आणि मेलेल्या कोंबड्या ज्या कोंबड्यांच्या संपर्कात आल्या होत्या. त्या सगळ्या कोंबड्या तिथल्या जवळच्या परिसरात नेऊन नष्ठ केल्या आहेत. अजूनही जिल्हा पशुसंवर्धन विभागातील काही अधिकारी असून ते लक्ष ठेऊन असल्याचे समजते.
जिल्हा पशु संवर्धन विभागाची चांगली कामगिरी
शहापूरमध्ये सुध्दा अशाच पध्दतीने कोंबड्या मेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मयत कोंबडय़ांचे नमुने केंद्रीय प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले असता त्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यू ने झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अर्नाळा, आगाशी परिसरात बर्ड फ्ल्यूचा संसर्ग वाढल्याने जिल्हा पशु संवर्धन विभागाचे अधिकारी, पुणे वैद्यकीय शाळेचे अधिकारी, अर्नाळा ग्रामपंचायत कर्मचारी असे 7 समूह एकत्र येऊन त्यांनी कारवाही केली आहे. बर्ड फ्लुची लागण झालेल्या परीसरातील एक किलोमीटर मधील कुकु्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या फार्मची तपासणी करून एक किलोमीटर परीसरातील २ ते ३ हज़ार कोंबड्या ताब्यात घेऊन त्यांची अर्नाळा पुरापाडा येथील डंपींग ग्राउंडवर खड्डा खणून त्वरीत विल्हेवाट लावुन, संपूर्ण परिसर निर्जंतुकरन केला असल्याची माहिती ही जिल्हा पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.