Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bird Flu | बर्ड फ्ल्यू माणसांनाही होऊ शकतो, काळजी घ्या; डॉ. अजित रानडे यांचं आवाहन

परभणीत बर्ड फ्ल्यूमुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचं आढळून आलं आहे. त्यापार्श्वभूमीवर 'टीव्ही9 मराठी'शी संवाद साधताना डॉ. अजित रानडे यांनी हे आवाहन केलं. (bird flu Virus can transmit to Humans says dr. ajit ranade)

Bird Flu | बर्ड फ्ल्यू माणसांनाही होऊ शकतो, काळजी घ्या; डॉ. अजित रानडे यांचं आवाहन
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 12:04 PM

मुंबई: राज्यात बर्ड फ्ल्यूने त्याचं अस्तित्व दाखवलं आहे. पक्ष्यांमध्ये होणारा हा आजार असला तरी तो माणसांनाही होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या, असं आवाहन पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित रानडे यांनी केलं आहे. (bird flu Virus can transmit to Humans says dr. ajit ranade)

परभणीत बर्ड फ्ल्यूमुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचं आढळून आलं आहे. त्यापार्श्वभूमीवर ‘टीव्ही9 मराठी’शी संवाद साधताना डॉ. अजित रानडे यांनी हे आवाहन केलं. बर्ड फ्ल्यू हा पक्ष्यांमध्ये होणारा आजार आहे. स्थलांतरित पक्ष्यांमुळे हा आजार पसरतो. हा विषाणू पक्ष्यांसाठी घातक आहे. माणसांनाही त्याची लागण होऊ शकते. पण माणसांना या रोगाची लागण होणं अत्यंत दुर्मिळ आहे. पण काळजी घेतली पाहिजे, असं रानडे म्हणाले.

जगात 42 लोकांना बर्ड फ्ल्यूची लागण

गेल्या पाच वर्षातील आकडेवारी पाहिली तर जगात आतापर्यंत 40 ते 42 लोकांना बर्ड फ्ल्यूची लागण झालेली आहे. महाराष्ट्रात तर अशी एकही केस आढळलेली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच पक्ष्यांसोबत राहणाऱ्यांनी काळजी घ्यायला हवी. पोल्ट्रीफार्ममध्ये स्थलांतरित पक्ष्यांचा शिरकाव होणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं.

चिकन-अंडी खा

मुंबईत अजूनही कुठे हा फ्ल्यू आढळलेला नाही. मुंबईत काही भागात मृत अवस्थेत पक्षी आढळून आले. त्यांचे नमूने तपासले जात आहेत. त्याचा अहवाल आल्यावरच योग्य ते निदान होईल, असंही ते म्हणाले. चिकन-अंडी खाण्यास हरकत नाही. पण 70 डिग्री तापमानावर ते शिजवून खावे, असं त्यांनी सांगितलं. 2006 साली पहिल्यांदा आपल्या देशात हा रोग आला. पुण्यात या रोगाचे नमूने तपासले जातात. त्यानंतर अंतिम परिक्षणासाठी भोपाळला पाठवतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (bird flu Virus can transmit to Humans says dr. ajit ranade)

संबंधित बातम्या:

Bird Flu | परभणीत 80 हजार कोंबड्या मारणार; 6 जिल्ह्यात धोका: मंत्री सुनील केदार

Bird Flu | परभणीत बर्ड फ्ल्यूचा धसका; संध्याकाळपर्यंत 10 हजार कोंबड्या नष्ट करणार

परभणीतल्या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती, महाराष्ट्र अलर्टवर

Bird Flu | राज्यात बर्ड फ्ल्यूचं संकट; चिकन-अंडी खाणाऱ्यांसाठी पशुसंवर्धन मंत्र्यांचा मोलाचा सल्ला

(bird flu Virus can transmit to Humans says dr. ajit ranade)

शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.