कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये भाजप-शिंदे गटाची सरशी, राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ

| Updated on: Dec 20, 2022 | 3:51 PM

कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायत निकालांमध्ये राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटात कांटे की टक्कर पाहायला मिळाली.

कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये भाजप-शिंदे गटाची सरशी, राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ
Kalyan election result 2022
Follow us on

Kalyan Gram Panchyat Election Result : कल्याण तालुक्यातील 9 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर या निकालाकडे सगळ्यांचेच लक्ष लागलं होतं. आतापर्यंत येथे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गट व शिंदे गटाची कसोटी लागली होती. आज झालेल्या निकाला अंती ठाकरे गटाच्या तीन,शिंदे गटाच्या तीन, तर भाजपच्या दोन जागा निवडून आल्या आहेत. एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा मात्र सुपडा साफ झाल्याचे पाहायला मिळालं.

कल्याण तालुक्यातील 9 ग्रामपंचायतीत काकडपाडा ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर इतर 8 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले होते. येथे सरासरी ८६.६२ टक्के मतदान झाले. एकूण ७,१५० मतदारांपैकी ६,१०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. कल्याण पंचायत समिती कार्यालयात आज मतमोजणी झाली. या मतमोजणीत जाहीर झालेल्या निकालाअंती ठाकरे गटाचे तीन,शिंदे गटाचे तीन,भाजपचे दोन उमेदवार तर एक अपक्ष उमेदवार सरपंच पदावर निवडून आले.

महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला खाते देखील उघडता आले नाही. विजय उमेदवारांनी पंचायत समिती कार्यालयाबाहेर गुलाल उधळत एकच जल्लोष केला.

कोणत्या ग्रामपंचायतीवर कोणाचे वर्चस्व?

गेरसे – शरद दिवाणे -ठाकरे गट

कोसले- दिलीप बाळाराम पालवी- ठाकरे गट

नांदप -अरुण शेलार- शिंदे गट

कुंदे – अलका शेलार – भाजप

काकडपाडा – महेश अशोक चौधरी -ठाकरे गट

वेहळे – रुचिरा देसले -शिंदे गट

पळसोली -अपेक्षा अनिल चौधरी -शिंदे गट

वासुंद्री – वनिता जाधव अपक्ष

वसतशेलवली – रवींद्र भोईर – भाजप