भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढली, अजित पवार-शिंदेंनी कितीही हट्ट धरला तरी सत्तेला सुरुंग नाहीच?; काय घडणार?

गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री पदाच्या हट्टापायीच भाजप-शिवसेनेची महायुती तुटली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले होते. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी प्रत्येक पक्ष आग्रही असणे हे साहजिकच आहे. पण जमिनीवरची सध्याची आकडेवारी पाहता भाजप पक्ष मुख्यमंत्री पदाचा खरा दावेदार आहे.

भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढली, अजित पवार-शिंदेंनी कितीही हट्ट धरला तरी सत्तेला सुरुंग नाहीच?; काय घडणार?
देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Nov 24, 2024 | 4:22 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे. या निवडणुकीत महायुतीचा प्रचंड मतांनी विजय झाला आहे. भाजपने तर या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपने 132 जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेना शिंदे गटाने 57 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 41 जागांवर विजय मिळवला आहे. या तीनही पक्षांचा स्ट्राईक रेट जबरदस्त राहिलाय. तसेच एकसंघपणाने निवडणूक लढल्यास कसा फायदा होतो हे या निवडणुकीने दाखवून दिलं आहे. या निकालामुळे महायुतीत सध्याच्या घडीला आनंदाचं वातावरण आहे. असं असलं तरीही मुख्यमंत्री आपल्याच पक्षाचा व्हावा, असं तीनही पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री पदाच्या हट्टापायीच भाजप-शिवसेनेची महायुती तुटली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले होते. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी प्रत्येक पक्ष आग्रही असणे हे साहजिकच आहे. पण जमिनीवरची सध्याची आकडेवारी पाहता भाजप पक्ष मुख्यमंत्री पदाचा खरा दावेदार आहे. या निकालाने आणखी एक गोष्ट निश्चित केली. या निवडणुकीत भाजपने132 जागा जिंकल्याने त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे.

महायुतीच्या सरकारला सुरुंगच लागणार नाही, कारण….

आता शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे किंवा राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवारांनी मुख्यमंत्री पदासाठी कितीही हट्ट केला आणि भाजपला ते पद द्यायची इच्छा नसेल तर ते त्यांना मिळणार नाही. तसेच भाजपने मुख्यमंत्री पद दिलं नाही म्हणून शिंदे-अजित पवार हे बंड पुकारूच शकणार नाहीत. कारण संख्याबळाचा विचार केला तर महाविकास आघाडीकडे फक्त 46 जागा आहेत. त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकतं असं गृहीत धरून भविष्यात शिंदे आणि अजित पवारांनी भाजपला एकटं पाडून महाविकास आघाडी सोबत सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला तरी ते शक्य नाही. त्यामागे देखील एक प्रमुख कारण आहे.

हे सुद्धा वाचा

अजित पवार पवार गट, शिंदे गट आणि महाविकास आघाडी या सर्वांच्या आकडेवारीचा विचार केला तर तो आकडा अगदी सीमारेषेवर म्हणजे 144 इथपर्यंत पोहोचतो. सत्तेसाठी 145 चा मॅजिक फिगरचा आकडा लागतो. त्यामुळे शिंदे-अजित पवारांनी महाविकास आघाडी सोबत जाणं अजिबात शक्य नाही. आणि तसं न झाल्यामुळे महायुतीच्या सरकारला पुढचे 5 वर्ष तरी सुरूंग लागणार नाही. तसेच सत्तेच्या सर्व किल्ल्या भाजपच्या हातीच राहतील. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाजपसोबत गोड बोलून अधिकची मंत्रिपदं आपल्या खिशात पाडून घ्यावे लागतील.

Non Stop LIVE Update
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.