Pankaja Munde | सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेट झाली का? पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे दिलं उत्तर

Pankaja Munde | सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली, अशा बातम्या येत होत्या. त्यावर आता अखेर पंकजा मुंडे यांनी मौन सोडलं आहे. पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडली.

Pankaja Munde | सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेट झाली का? पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे दिलं उत्तर
Pankaja Munde
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 1:12 PM

मुंबई : मागच्या दोन-तीन दिवसांपासून पंकजा मुंडे या काँग्रेसमध्ये जाणार अशा चर्चा होत्या. त्यांनी सांगलीतील एका मोठ्या नेत्याच्या माध्यमातून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली, अशा बातम्या येत होत्या. त्यावर आता अखेर पंकजा मुंडे यांनी मौन सोडलं आहे. पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडली. “मी आज पत्रकार परिषद बोलवली आहे, कारण मला शेकडो कॉल येत आहेत. 2019 मध्ये मी भाजपची उमेदवार होते. माझा पराभव झाला. त्यानंतर गेले 4 वर्ष मी नाराज आहे. मी पक्ष सोडणार, अशा चर्चा सुरू झाल्या. मला स्वतःला सिद्ध करायच नाहीय. अनेक पक्षाचे नेते देखील बोलत होते की, पंकजा मुंडे अल्या तर त्यांना पक्षात स्थान देऊ. मी सर्व हे सहजतेने घेतलं” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

माझं करिअर संपवण्याचा डाव कुणाचा?”

“पण आता मी सांगलीतील मोठ्या नेत्याच्या माध्यमातून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली अशा बातम्या येत आहेत. मी काँग्रेस नेत्यांची भेट घेतलेली नाही. माझं करिअर संपवण्याचा हा डाव नेमका कुणाचा?” असा सवाल पंकजा मुंडे यांनी विचारला.

पंकजा मुंडे कोणाविरुद्ध खटला दाखल करणार?

“तुम्ही प्रश्न चिन्ह लावून बातम्या देता? पण त्यामागची सत्यता तपासली पाहिजे. मी गेली 20 वर्ष राजकारणात काम करत आहे. चर्चा मुद्दाम घडवून आणल्या जात आहेत. पंकजा मुंडे पात्र की अपात्र? हे पक्ष ठरवेल मी कसं सांगू. पाठित खंजीर खुपसण्याच रक्त माझं नाही. ज्या चॅनलने काँग्रेस नेत्यांची भेट घेतली ही बातमी दिली. त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार. त्यांच्याकडे पुरावे मागणार?” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

मी ईश्वर साक्ष आज शपथ घेते की…..

“माझ्यावर अनेक आरोप झाले. मला पराभव पत्करावे लागले. मी ईश्वर साक्ष आज शपथ घेते की, मी कोणत्याही नेत्याला, कोणत्याही पक्षाला माझ्या पक्ष प्रवेशासाठी कधीही भेटले नाही. मी माझ्या आयुष्यात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना भेटले सुध्दा नाही” असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

भाषणाचे तुकडे काढून अर्थ लावले जातात “माझ्या भाषणाचे तुकडे काढून अर्थ लावले जातात. मला विधान परिषदेला दोन्ही वेळा फॉर्म भरायला सांगितला. पण ऐनवेळी सांगितलं गेलं की फॉर्म भरायचा नाही, मी काही बोलले नाहीं कारण तो पक्षचा आदेश आहे” असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. “मी कुठलाही निर्णय डंके की चोट पर करेन. भाजपाचा विचार माझ्या रक्तात आहे. पक्ष हा सगळ्यात महत्वाचा आहे माझ्यासाठी. अप्रामाणिकपणा माझ्या स्वभावात नाही. मी मुद्द्यावर बोलते” असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.