भाजपच्या दिल्लीतल्या बैठकीतली Inside Story, महाराष्ट्रात कुणाकुणाची उमेदवारी फिक्स?

भाजपच्या दिल्ली येथील मुख्यालयात आज संध्याकाळी अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्रातील भाजपचे दिग्गज नेते दिल्लीला गेले होते. या बैठकीत महाराष्ट्रातील भाजपच्या उमेदवारांबाबत चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीत कुणाकुणाला उमेदवारी देण्यात यावी, याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

भाजपच्या दिल्लीतल्या बैठकीतली Inside Story, महाराष्ट्रात कुणाकुणाची उमेदवारी फिक्स?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 11, 2024 | 10:32 PM

संदीप राजगोळकर, Tv9 मराठी, नवी दिल्ली | 11 मार्च 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आज अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. भाजपची दिल्लीत आज केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला गेले आहेत. या बैठकीआधी भाजपच्या राज्याच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्यानंतर पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातील 25 जागांवर चर्चा झाली आहे. भाजपच्या विद्यमान 25 जागांवर आजच्या बैठकीत चर्चा झालीय. त्यानंतर आता उद्या भाजपची उमेदवारांची दुसरी यादी येण्याची शक्यता आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या जागांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, प्रामुख्याने 25 जागांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

‘या’ नेत्यांची उमेदवारी जवळपास निश्चित?

भाजपच्या आजच्या बैठकीत नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर जालन्यातून मंत्री रावसाहेब दानवे यांना पुन्हा एकदा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तर पुण्यातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. सांगलीतून संजयकाका पाटील यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना भिवंडीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर केंद्रीय मंत्री भारती पवार यांना दिंडोरीतून उमेदवारी देण्याबाबत चर्चा झालीय. एकूण 25 जागांवर चर्चा झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या आजच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्राच्या भाजप नेत्यांकडून राज्यातील 25 जागांबाबतचं सादरीकरण करण्यात आलं आहे. लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीवेळी भाजप ज्या मतदारसंघातून निवडणूक लढली होती, त्यापैकी जिंकलेल्या 23 आणि पराभवी झालेल्या चंद्रपूर आणि बारामती अशा 2 जागांचं सादरीकरण आजच्या बैठकीत करण्यात आलं. चंद्रपूरच्या जागेवर सुधीर मुनगंटीवार यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरवलं जाऊ शकतं. तर बारामतीची जागा अजित पवार गटाला दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

विशेष म्हणजे कर्नाटकच्या भाजप नेत्यांनीदेखील आजच्या बैठकीत सादरीकरण केलं आहे. कर्नाटकच्या भाजप नेत्यांनी एकूण 28 जागांचं तर महाराष्ट्राच्या नेत्यांनी 25 जागांचं सादरीकरण केलं आहे. आता इतर राज्यांची बैठक भाजपची केंद्रीय निवडणूक समिती घेत आहे. त्यानंतर कदाचित पुढच्या 24 तासात म्हणजे उद्या दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत भाजपची दुसरी उमेदवारांची यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.