Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपाच्या आरक्षणविरोधी कुटील डावाची पोलखोल करणार; काँग्रेसचे डॉ. संजय लाखे पाटील मराठवाड्याच्या दौऱ्यावर

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील हे राज्याचा दौरा करत आहेत. congress Dr. Sanjay Lakhe Patil Marathwada

भाजपाच्या आरक्षणविरोधी कुटील डावाची पोलखोल करणार; काँग्रेसचे डॉ. संजय लाखे पाटील मराठवाड्याच्या दौऱ्यावर
Congress flag
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 5:43 PM

मुंबई: भाजपाच्या आरक्षणविरोधी कुटील डावाची पोलखोल करण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात भारतीय जनता पक्षाकडून चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जात आहे. भाजपाचा हा खोटारडेपणा उघड करून मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द होण्यास भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहे ही वस्तुस्थिती समाजाला करून देण्यासाठी SEBC आरक्षणाचे अभ्यासक, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील हे राज्याचा दौरा करत आहेत. या दौऱ्याची सुरुवात बुधवारी 2 जूनपासून होत असून 2 जून ते 5 पर्यंत ते मराठवाड्याचा दौरा करत आहेत. (BJP crooked left against reservation will be polled; congress Dr. Sanjay Lakhe Patil on a tour of Marathwada)

फडणवीस सरकारने केलेल्या कुटील डावाची पोलखोल करणार

लाखे पाटील या दौऱ्यात मराठा आरक्षणाची सत्य घटनात्मक कायदेशीर बाजू आणि पेच, काँग्रेसचे नेते, लोकप्रतिनिधी, मराठा समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून बैठका घेऊन तसेच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेसमोर मांडणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी केंद्रातील भाजपचे नरेंद्र मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने केलेल्या कुटील डावाची पोलखोल संजय लाखे पाटील करणार आहेत.

डॉ. संजय लाखे पाटील यांचा मराठवाडा दौरा

>> बुधवार 2 जून रोजी सकाळी 11 वाजता नांदेड शहर-ग्रामीण काँग्रेस कमिटी आयोजित बैठक. सायंकाळी 4.30 वाजता अंबेजोगाई, जिल्हा बीड, येथे काँग्रेस कमिटी आयोजित बैठक. >> गुरुवार 3 जून रोजी सकाळी 11 वाजता लातूर ग्रामीण-शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित बैठक, 4.30 वाजता उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित बैठक. >> शुक्रवार 4 जून रोजी सकाळी 11 वाजता बीड येथे आगमन व बीड जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित बैठक. संध्याकाळी 4.30 वाजता जालना येथे आगमन व जालना जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित बैठक. >> शनिवार 5 जून रोजी सकाळी 11 वाजता औरंगाबाद ग्रामीण-शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित बैठक.

संबंधित बातम्या

संजय राऊतांची अवस्था ना घरका ना घाटका; देवेंद्र फडणवीसांची टीका

डॅमेज कंट्रोलची गरज ठाकरे सरकारला आहे, भाजपला नाही, फडणविसांचा टोला

BJP crooked left against reservation will be polled; congress Dr. Sanjay Lakhe Patil on a tour of Marathwada

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.