भाजपाने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवून बदनाम केले : नाना पटोले

यावेळी बोलताना पटोले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित समाज घटकाला मुख्य प्रवाहात आणले. देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो, पण हे संविधानच बदलण्याचे काम सुरू आहे. सर्व काही खासगीकरण करून आरक्षण संपुष्टात आणले जात आहे. शेतकरी, कामगार, तरुण वर्गाला संपवण्याचे काम केले जात आहे.

भाजपाने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवून बदनाम केले : नाना पटोले
nana patole
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 6:08 PM

मुंबई : केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यापासून वंचित, दलित, शोषित समाज घटकांवरचे अत्याचार वाढलेत. या मनुवादी विचाराच्या सरकारने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी चळवळ ठरवून बदनाम करण्याचे पाप केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि आंबेडकरी चळवळ संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या व्यवस्थेला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले.

काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांचा पदग्रहण सोहळा

टिळक भवन येथे पार पडलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आ. राजेश राठोड, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, भा. ई. नगराळे, शरद आहेर, विजय अंभोरे, सरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रभारी मनोज बागडी, प्रदेश सरचिटणीस जितेंद्र देहाडे, हेमंत ओगले, अमर खानापुरे, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कुणाल राऊत, शिवानी वडेट्टीवार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आंबेडकर यांनी वंचित समाज घटकाला मुख्य प्रवाहात आणले

यावेळी बोलताना पटोले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित समाज घटकाला मुख्य प्रवाहात आणले. देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो, पण हे संविधानच बदलण्याचे काम सुरू आहे. सर्व काही खासगीकरण करून आरक्षण संपुष्टात आणले जात आहे. शेतकरी, कामगार, तरुण वर्गाला संपवण्याचे काम केले जात आहे. बाबासाहेबांचा विचार टिकला तरच देश वाचेल त्यासाठी आंबेडकरांचा विचार, काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवा. देशात परिवर्तन घडेल तर ते महाराष्ट्रातूनच आणि हे परिवर्तन घडवण्यासाठी जोमाने काम करा, असे आवाहन पटोले यांनी केले.

काम करणाऱ्या कार्यकर्त्याला काँग्रेसमध्ये संधी

यावेळी बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, काम करणाऱ्या कार्यकर्त्याला काँग्रेसमध्ये संधी मिळेत हेच सिद्धार्थ यांना मिळालेल्या जबाबदारीने पुन्हा दाखवून दिलं. काँग्रेसच्या पाठीमागे दलितांचे संघटन उभे करा. काँग्रेसला सर्वात जास्त ताकद देणारं राज्य म्हणून महाराष्ट्र पुढे आले पाहिजे. त्यासाठी संघटन वाढवा आणि संघटन वाढवण्यासाठी संपर्क, समर्पण, संवाद, साधना, समन्वय या पाच घटकांवर भर द्या.

काँग्रेस पक्ष नेहमीच सामान्य लोकांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या, काँग्रेस पक्ष नेहमीच सामान्य लोकांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे. संविधान आणि लोकशाहीला मानणारा पक्ष आहे. काँग्रेसने सामाजिक न्यायाची भूमिका कायम घेतली आहे म्हणूनच सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यालाही मोठी संधी काँग्रेसमध्ये दिली जाते. कार्यकर्ता चांगले काम करत असेल, निष्ठावान असेल तर पक्ष त्याची नक्की दखल घेते त्याचेच उदाहरण सिद्धार्थ हत्तीअंबिरे आहे. काँग्रेसचा विचार, बाबासाहेबांचा विचार घेऊन काम करत राहा, असे आवाहनही त्यांनी केले.

सोनिया गांधी, राहुल गांधी, नानाभाऊ यांनी मोठी जबाबदारी

यावेळी बोलताना सिद्धार्थ हत्तीअंबिरे म्हणाले की, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सोनिया गांधी, राहुल गांधी, नानाभाऊ यांनी मोठी जबाबदारी दिली. ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून संघटन मजबूत करेन. वंचित, शोषित घटकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन. यावेळी सर्व वक्त्यांनी सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

संबंधित बातम्या

‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’, आर्यन खानच्या जामीनानंतर नवाब मलिकांचा समीर वानखेडेंना इशारा

मालेगावात समाजवादी पक्षाला तर बुलडाण्यात भाजपला धक्का, काँग्रेस राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचे सोहळे!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.