विष्णू सावरा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी फडणवीस, चंद्रकांत पाटील राहणार उपस्थित

माजी आदिवासी विकासमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विष्णू सवरा यांचं बुधवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

विष्णू सावरा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी फडणवीस, चंद्रकांत पाटील राहणार उपस्थित
Follow us
| Updated on: Dec 10, 2020 | 8:29 AM

पालघर : माजी आदिवासी विकासमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विष्णू सवरा यांचं बुधवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचे पार्थिव आज 10 डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता त्याच्या उत्कर्षनगर इथल्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे. तर नऊ वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, दुपारी 1 वाजता वाडा इथल्या शिदेश्वर नदीकाठी स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. तर विष्णू सवरा यांच्या अंत्यविधीला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, तसंच भारतीय जनता पक्षाचे इतर आमदार उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (devendra Fadnavis and Chandrakant Patil will be present for the funeral of Vishnu Savara)

विष्णू सावरा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी भाजपमधील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत. खरंतर, विष्णू सावरा यांचं असं अकाली जाणं हा भाजपसाठी मोठा धक्का आहे. संवेदनशील, जागृत, कर्तव्यदक्ष अशी ओळख असलेले आणि आदिवासी विकास खात्याचे माजी मंत्री विष्णू सावरा यांना दोन वर्षांपासून यकृताच्या आजाराने ग्रासले होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सवरा यांच्या निधनाने संवेदनशील, कर्तव्यदक्ष नेता हरपल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

विष्णू सवरा हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी ते जोडलेले होते. 1980मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामधील चांगल्या पगाराची नोकरी सोडून ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशकर्ते झाले. 1980 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भारतीय जनता पक्षाने वाडा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. 1985च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाकडून पुन्हा वाडा मतदारसंघातून निवडणूक लढवली. यावेळीही त्यांचा निसटता पराभव झाला होता. दोनदा पराभव झाल्यानंतरही 1990च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं पुन्हा एकदा त्यांना वाडा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, पण यावेळी मात्र त्यांनी विजयाचा गुलाल उधळला. ते सहा वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले.

मंत्री झाल्यानंतर आपल्या मितभाषी स्वभावामुळे त्यांनी एक वेगळीच छाप पाडली

2014 मध्ये भाजप सरकारमध्ये त्यांच्यावर पुन्हा आदिवासी विकास खात्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्याचे पहिले पालकमंत्री होण्याचाही त्यांना सन्मान मिळाला होता. मंत्री झाल्यानंतर आपल्या मितभाषी स्वभावामुळे त्यांनी एक वेगळीच छाप पाडली होती. तत्पूर्वी 1995च्या युती सरकारच्या काळात त्यांना शेवटच्या टप्प्यात 1 फेब्रुवारी 1999 रोजी आदिवासी विकासमंत्री होण्याचा मान मिळाला होता. अवघे सहा महिने मिळालेल्या मंत्रिपदातून त्यांनी अनेक विकासाची कामे केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा फडणवीसांच्या कार्यकाळात त्यांना आदिवासी विकासमंत्रिपदाचा बहुमान मिळाला.

30 वर्षे वाडा विभागाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी विधानसभेत सूचना, लक्षवेधी, तारांकित प्रश्न उपस्थित करत त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाने आदिवासी भागातील अनेक समस्या मार्गी लावल्या. सत्तेपेक्षा सेवा समाधानकारक मानणा-या विष्णु सवरा यांनी आमदार निधी, डोंगरी विकास निधी, विशेष घटक योजना, नाबार्ड, हुडको, विशेष दुरुस्ती, वैज्ञानिक विकास, कोकण विकास व बजेटच्या माध्यमातून अनेक विकासकामे करण्यामध्ये त्यांनी यश मिळवले. (devendra Fadnavis and Chandrakant Patil will be present for the funeral of Vishnu Savara)

इतर बातम्या – 

ठाकरे मंत्रिमंडळाचे 5 मोठे निर्णय; शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबविणार

केंद्र सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला, काय म्हटलंय नव्या प्रस्तावात…?

(devendra Fadnavis and Chandrakant Patil will be present for the funeral of Vishnu Savara)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.