भाजपचे माजी आमदार शिंदेसेनेच्या वाटेवर ?, थेट विधानसभा उमेदवारीसाठी एकनाथ शिंदे यांना गळ

MLA Mallikarjun Reddy: मी गेल्या पाच वर्षांपासून निवडणुकीची तयारी करत आहे. आमच्या नेत्यांनी आदेश दिल्यास मी निवडणूक लढणार आहे. रामटेक मतदारसंघात समाधानकारक विकास कामे झाली नाहीत, त्यामुळे विद्यामान आमदारावर लोकांचीही नाराजी आहे.

भाजपचे माजी आमदार शिंदेसेनेच्या वाटेवर ?, थेट विधानसभा उमेदवारीसाठी एकनाथ शिंदे यांना गळ
Mallikarjun Reddy and eknath shinde
Follow us
| Updated on: Jun 25, 2024 | 10:13 AM

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीला यश आले नाही. त्यानंतर आता महायुतीकडून विधानसभा निवडणुकीची रणनीती तयार केली जात आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत फटका बसू नये, यासाठी जागा वाटपावर चर्चा सुरु झाली आहे. त्याचवेळी विदर्भात भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून धक्का बसणार आहे. रामटेक उमेदवारीबाबत भाजपचे माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. यामुळे रामटेकचे माजी भाजप आमदार मल्लीकार्जुन रेड्डी शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यामुळे विदर्भात भारतीय जनता पक्षाला धक्का शिवसेनेकडूनच बसणार आहे.

रामटेक विधानसभेची परिस्थिती काय?

रामटेकमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून आशिष नंदकिशोर जैस्वाल यांनी २०१९ मधील विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांनी भाजपचे द्वाराम मल्लिकार्जुन रेड्डी यांचा पराभव केला होता. जैस्वाल आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे समर्थक आहेत. परंतु आता शिवसेना शिंदे गटाकडून इतर उमेदवारांची चाचपणी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे रामटेक उमेदवारीबाबत भाजपचे माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि चर्चा केली आहे.

भाजपकडून शिंदे गटात जाण्याची तयारी

विधानसभा निवडणुकीसाठी रामटेकचे माजी भाजप आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांनी तयारी सुरु केली आहे. भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता नसल्यामुळे त्यांनी शिवसेना शिंदे गटाचा पर्याय निवडला आहे. त्यासाठी ते शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेना शिंदे गटाकडून रामटेक विघानसभेसाठी पर्यायी उमेदवारांची चाचपणी केली जात असल्यामुळे रेड्डी यांनी एकनाथ शिंदे यांना संपर्क साधला.

हे सुद्धा वाचा

माझी तयारी, आदेशाची प्रतिक्षा

माजी भाजप आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांनी सांगितले की, “मी गेल्या पाच वर्षांपासून निवडणुकीची तयारी करत आहे. आमच्या नेत्यांनी आदेश दिल्यास मी निवडणूक लढणार आहे. रामटेक मतदारसंघात समाधानकारक विकास कामे झाली नाहीत, त्यामुळे विद्यामान आमदारावर लोकांचीही नाराजी आहे. ”

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.