tv9 स्पेशल रिपोर्ट : राज ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होणार? भाजपची सर्वात मोठी ऑफर?

4 दिवसांआधी दिल्लीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांची महाराष्ट्रातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक झाली. मात्र या बैठकीत राज ठाकरेंसमोर सर्वात मोठा पर्याय ठेवण्यात आल्याची चर्चा आहे आणि ही चर्चा आहे, राज ठाकरेंच्या हाती शिवसेना दिली जाणार का? पाहुयात त्यावरचा हा रिपोर्ट

tv9 स्पेशल रिपोर्ट : राज ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होणार? भाजपची सर्वात मोठी ऑफर?
राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या दिल्लीतील भेटीचा फोटो
Follow us
| Updated on: Mar 23, 2024 | 8:18 PM

आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत दिल्लीत बैठक… नंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत मुंबईत ताज लँड्स हॉटेलमध्ये चर्चा…. राज ठाकरेंसोबत भाजपचं केंद्रीय नेतृत्व आणि महाराष्ट्रातल्या नेतृत्वासोबत ही चर्चा फक्त मनसेला महायुतीत घेणं एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. राज ठाकरेंना सोबत घेण्यामागं, मोठी रणनीती असल्याची चर्चा आहे. सध्याच्या राजकीय स्थितीनुसार भाजपनं राज ठाकरेंसमोर 3 पर्याय ठेवल्याचं कळतंय. त्यातला पहिला पर्याय सर्वात मोठा आहे. मनसेचं शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरण करुन, शिवसेनेचं नेतृत्वच राज ठाकरेंनी करावं. म्हणजेच शिवसेनेची कमान राज ठाकरेंकडे द्यावी अर्थात शिवसेनेचं अध्यक्ष राज ठाकरेंनी व्हावं.

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली. निवडणूक आयोगानं शिवसेना शिंदेंच्याच हातात दिली. आता हीच शिवसेना, राज ठाकरेंना सोबत घेऊन त्यांच्याच हाती देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती आहे. मात्र तूर्तास तात्काळ होकार देण्यास राज ठाकरेंनी नकार दिला असून, सुरुवातीला इतर पर्यायांवर विचार करणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे शिंदेंच्या बंडानंतरही राज ठाकरेंच्या नावाची चर्चा सुरु झाली होती. मात्र, त्यावेळी तसं काहीही घडलेलं नाही. आता पुन्हा हालचाली सुरु झाल्याचं दिसतंय.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच, राज ठाकरेंनी शिवसेना सोडली. माझा वाद विठ्ठलाशी नाहीच, तर त्यांच्या आजूबाजूला असलेल्या बडव्यांशी आहे, असं त्यावेळी राज ठाकरे म्हणाले आणि त्यानंतरच्या भाषणात तर उद्धव ठाकरेंमुळंच शिवसेना सोडल्याचं वारंवार सांगितलं. सध्या उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना निसटलीय. शिवसेनेचं नेतृत्व मुख्यमंत्री शिंदे करत आहेत. आता राज ठाकरेंसमोर जो प्रस्ताव ठेवलाय, त्याचं उद्देश म्हणजे शिवसेना दुसऱ्या ठाकरेंच्याच हाती जाईल.

आता यावरुन काही प्रश्नही निर्माण होत आहेत

  • पहिला प्रश्न आहे, जर मनसे शिवसेनेत विलीन झाल्यास, शिंदे गटाचं काय होणार ?
  • दुसरा प्रश्न आहे, राज ठाकरे एवढा मोठा निर्णय घेणार का? कारण बाळासाहेबांना सोडून मनसेची स्थापना केल्यानंतर राज ठाकरेंसाठी त्यांच्या राजकीय आयुष्यातला दुसरा मोठा निर्णय असेल. 18 वर्षांपासून राज ठाकरे ज्या मनसेचं नेतृत्व करत आहेत. ती मनसे पुढं दिसणार नाही.
  • तिसरा प्रश्न आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हे मान्य होईल का? सध्या शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून शिवसेनेचं नेतृत्व शिंदेंच करत आहेत. जर, मनसे विलीन करुन राज ठाकरेंना शिवसेनेचं अध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव असेल तर, शिंदे राज ठाकरेंचं नेतृत्वं मान्य करतील का ?
  • चौथा प्रश्न आहे, शिंदेंच्या आमदारांना मान्य होईल का? एकनाथ शिंदेंसोबत 40 आमदार आणि 13 खासदार आहेत. या सर्वांना शिवसेना राज ठाकरेंच्या हाती जाणं मान्य असेल का ?
  • पाचवा प्रश्न आहे, राज ठाकरेंच्या हाती आणि शिंदेंच्या हाती कोणते अधिकार असतील? जर शिवसेनेची कमान राज ठाकरेंच्या हाती गेलीच तर मग राज ठाकरेंना पक्षात कोणते अधिकार असतील? आणि एकनाथ शिंदेंचा रोल काय असेल? तसंच त्यांना किती अधिकार असतील?

चर्चा आहेत की यात काही तथ्य?

प्रश्न अनेक आहेत. पण सध्या चर्चाच आहे. त्यामुळे खरंच राजकीय धुरळा उठवण्यासाठीच चर्चा आहे की यात काही तथ्य आहे हे काळच ठरवेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं अनेकदा बोललं गेलं. त्यासाठी आपणच 2014च्या विधानसभेत भाजपनं युती तोडल्यानंतर प्रयत्न केल्याचंही राज ठाकरेंनी सांगितलं होतं. आणि गेल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात त्यांनी उद्धव ठाकरेंचा किस्सा सांगून शिवसेनेतून बाहेर काढण्याचे कसे प्रयत्न झाले हे सांगितलं.

भाजपकडून राज ठाकरेंना आणखी दोन पर्याय

भाजपकडून राज ठाकरेंसमोर दुसरा पर्याय आहे. मनसेनं महायुतीत यावं. त्यासाठी लोकसभेला 2-3 जागा मनसेला सोडण्यात येईल आणि तिसरा पर्याय आहे , लोकसभेला जागा न देता विधानसभेला अधिक जागा देऊ, पण आता राज ठाकरेंनी महायुतीचा प्रचार करावा. भाजपच्याच भाषेत सांगायचं झालं तर राजकारण अर्थमेटिक नाही तर केमिट्री आहे. इथं 1 आणि 1, दोन नाही तर 11 होऊ शकतात. आता राज ठाकरे कोणत्या पर्यायात फिट बसतात याचा उलगडा 2-3 दिवसांत होईल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.