BJP Maharashtra | भाजपच्या गोटातील मोठी बातमी, आमदार-खासदारांना अतिशय मोलाची सूचना

भाजपच्या गोटातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भाजपच्या गोटात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. एकीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात कार्यकारिणीची बैठक घेतली. तर दुसरीकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील पक्षाच्या सर्व आमदारांना मोलाची सूचना दिलीय.

BJP Maharashtra | भाजपच्या गोटातील मोठी बातमी, आमदार-खासदारांना अतिशय मोलाची सूचना
Follow us
| Updated on: Sep 21, 2023 | 5:54 PM

मुंबई | 21 सप्टेंबर 2023 : देशात पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालाचाली घडत आहेत. देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या गोटात जोरदार हालचाली सुरु आहेत. या विरोधकांची इंडिया आघाडी पुढची रणनीती ठरत आहे. त्यानंतर भाजपने देखील आता कंबर कसलं आहे. भाजपच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्व भाजप आमदारांना कामाला लागण्याची सूचना दिली आहे. तसेच मंत्रिपदाची अपेक्षा करु नका, पण कामाला लागा, असे आदेशच आमदारांना देण्यात आले आहेत.

मंत्रिमंडळ विस्तारापेक्षा आपल्याला लोकसभेची निवडणूक जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे कामाला लागा, अशी सूचना भाजपच्या वरिष्ठांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभेच्या मिशन 45 प्लससाटी भाजपकडून आमदारांवर मोठी जबादारी सोपविण्यात आली आहे.मंत्रिपदाची अपेक्षा न ठेवता लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश भाजपच्या वरिष्ठांनी राज्यातील सर्व आमदांराना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजपच्या कार्यकारिणीची पुण्यात बैठक

भाजपच्या कार्यकारिणीची पुण्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2024 च्या महा विजयाचे शिलेदार बना, अशी सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुण्यातील कार्यकारिणीला नेमक्या सूचना काय?

नरेंद्र मोदींच्या देशसेवेत हातभार लावण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. या संधीचं सोनं करा. आजपासूनच पुणे महानगरपालिकेच्या वतीने निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. पुणे जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघ आपल्याला जिंकायचे आहेत. त्यामुळे आजपासून कामाला लागा, अशी सूचना चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यातील नवनिर्वाचित कार्यकारणीच्या बैठकीत दिल्या.

‘आमचा 45 जागा निवडून आणण्याचा संकल्प’

या बैठकीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “महविजय 2024 चा संकल्प आज झाला. आमचा 45 जागा निवडून आणण्याचा संकल्प आहे. पुण्यातील मतदारसंघ राज्यातील इतर मतदारसंघांच्या तुलनेत सर्वात जास्त मतांनी जिंकावीत, असं नियोजन केलं आहे. मत हे कर्ज आहे आणि हे जिंकून नागरिकांना परत देणे हा आमचा विश्वास आहे आणि आम्ही नागरिकांना पुन्हा देऊ. आमच्या पक्षात कोणीही नाराज नाही. देशासाठी, राज्यासाठी आणि त्याच्या भविष्यासाठी काम करायचं आहे”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.