भाजप सरकारने इंधनाचे दर कमी करावेत; नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

केंद्रातील भाजप सरकारने तातडीने इंधनाचे दर कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार यांनी केली आहे.

भाजप सरकारने इंधनाचे दर कमी करावेत; नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
खिरमाणी येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या शाखेचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार यांनी केले.
Follow us
| Updated on: Oct 31, 2021 | 3:53 PM

नाशिक: ऐन सणासुदीच्या काळात केंद्रातील मोदी सरकारने घरगुती गॅस, पेट्रोल व डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढविले असून प्रचंड महागाई वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आता जगायचे कसे ? असा प्रश्न पडला आहे. केंद्रातील भाजप सरकारने तातडीने इंधनाचे दर कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार यांनी केली आहे.

बागलाण तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या शाखांची उद्घाटने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांच्या हस्ते करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, तालुकाध्यक्ष शैलेश सुर्यवंशी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निरीक्षक सुनील आहेर, तालुकाध्यक्ष सम्राट काकडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुयोग आहिरे आदींची भाषणे झाली. अच्छे दिनच्या घोषणेला भुलून निवडून दिलेल्या केंद्रातील भाजप सरकारला सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांशी कुठलेही देणेघेणे नसल्याचा आरोप माजी आमदार संजय चव्हाण यांनी यावेळी केला. आगामी काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीच्या विरोधात अजूनही आक्रमक आंदोलने केले जातील, असे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या खिरमाणी येथील शाखेच्या अध्यक्षपदी दिनेश भदाणे तर श्रीपुरवडे येथील शाखेच्या अध्यक्षपदी वैभव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली.

महागाईचा भडका उडाल्याने टीकास्त्र

केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांमुळेच पेट्रोलने व डिझेलने प्रति लिटरला किमतीचे शतक पार केले असून घरगुती गॅस हजाराच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महागाईचा भडका उडाला असून महंगाई को लगातार बढानेवालो, जनता माफ नही करेगी, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी दिला आहे. ते खिरमाणी व श्रीपुरवडे येथील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या शाखांच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निरीक्षक सुनील आहेर, तालुकाध्यक्ष सम्राट काकडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुयोग आहिरे, माहिती व तंत्रज्ञान सेलचे तालुकाध्यक्ष प्रीतीश भदाणे, नामपूर शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मेघदीप सावंत, चारुदत्त खैरनार आदी उपस्थित होते.

इतर बातम्याः

730 कामगारांना कामावर कधी घेणार; BOSCH कंपनीला कामगार उपायुक्तांचा सवाल

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना 41 कोटींची मदत; दिवाळीच्या आत खात्यावर जमा करण्याच्या सूचना

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.