AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाईफेकीनंतर पोशाख बदलून रावसाहेब दानवे पुन्हा बैठकीत, धक्काबुक्कीनंतर अखेर जळगाव भाजप जिल्हाध्यक्ष ठरला

माजी आमदार माजी खासदार हरिभाऊ जावळे (BJP Jalgaon president selection) यांची ‘एकमताने’ निवड करण्यात आल्याची घोषणा, भाजप खासदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केली.

शाईफेकीनंतर पोशाख बदलून रावसाहेब दानवे पुन्हा बैठकीत, धक्काबुक्कीनंतर अखेर जळगाव भाजप जिल्हाध्यक्ष ठरला
Follow us
| Updated on: Jan 10, 2020 | 5:21 PM

जळगाव : धक्काबुक्की, शाईफेक आणि राडेबाजीनंतर अखेर जळगाव जिल्ह्याचा भाजप अध्यक्ष ठरला आहे. माजी आमदार माजी खासदार हरिभाऊ जावळे (BJP Jalgaon president selection) यांची ‘एकमताने’ निवड करण्यात आल्याची घोषणा, भाजप खासदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केली. या निवडीआधी रावसाहेब दानवे, गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यासमोरच कार्यकर्त्यांनी राडा घातला होता. इतकंच नाही तर शाईफेकीचाही प्रकार घडला. (BJP Jalgaon president selection)

मात्र त्यानंतर रावसाहेब दानवे हे कपडे बदलून पुन्हा बैठकीला आले. त्यानंतर निवडप्रक्रियेला सुरुवात झाली. अध्यक्षपदासाठी 18 जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील 9 जणांनी माघार घेतली. मग एकमताने माजी खासदार हरिभाऊ जावळे यांची निवड करण्यात आली.

बंद खोलीत चर्चा

भाजपच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु होती. या पदासाठी एकूण 18 जणांनी अर्ज दाखल केले होते. मात्र त्यातील 9 जणांनी माघार घेतली. पण उर्वरित 9 जण माघार घेण्यास तयार नव्हते. या 9 जणांना एका बंद खोलीत चर्चेसाठी नेण्यात आले. त्यांच्यासोबत रावसाहेब दानवे, गिरीश महाजन यांनी चर्चा केली.

रावसाहेब दानवे

राज्यात भाजप आणि शिवसेनेला बहुमताने जनतेने निवडून आणलं. काही कारणांमुळे ज्या घटना घडल्या त्या चांगल्या नाहीत, चुकीच्या आहेत. या घटनेची गांभीर्याने निर्णय घेऊन, सुनील यांना काळं फसलं त्या कार्यकर्त्यांना पक्षातून निलंबित करण्यात यावे, असं दानवे म्हणाले.

भाजप जिल्हा जळगाव अध्यक्षपदासाठी 18 नाव इच्छुकांमध्ये होते. यात नऊ लोकांनी माघार घेतली. सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला, भाजप जळगाव जिल्हाअध्यक्ष म्हणून माजी आमदार, माजी खासदार हरिभाऊ जावळे यांची एकमताने निवड झाली, अशी घोषणा रावसाहेब दानवे यांनी केली.

शाईफेक आणि धक्काबुक्की

जळगाव  भाजप जिल्हाध्यक्षच्या निवडणुकीसाठी आज बैठक आयोजित केली होती. या बैठकीत भुसावळ तालुका अध्यक्ष निवडीच्या विषयावरून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यावेळी काही आक्रमक कार्यकर्त्यांनी थेट भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या अंगावर शाई फेकली. बैठकीत झालेला वाद पाहून रावसाहेब दानवे यांनी सभागृहातून काढता पाय घेतला.

जळगाव  भाजप जिल्हाध्यक्षच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये रावसाहेब दानवे, गिरीश महाजन आणि भाजपाचे आमदार उपस्थित असताना, निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच भुसावळ येथील कार्यकर्त्यांनी आपला आक्षेप नोंदविला. याची दखल घेत असताना काही कार्यकर्ते स्टेजवर चढले. त्यांनी भाजपाचे भुसावळ येथील नगरसेवक संघटन सचिव सुनील नवे यांच्या अंगावर शाई फेकली, त्यांच्या तोंडाला शाई लावली. त्यावेळेस भाजपाच्या  उपस्थित नेते  गिरीश महाजन, रावसाहेब दानवे यांच्यावरही शाई उडाली. धावपळीमध्ये अनेकांच्या अंगावर शाई पडली.

हा गोंधळ सुरू असताना रावसाहेब दानवे हे निवडणुकीचा कार्यक्रम सोडून निघून गेले. यावेळी गिरीश महाजन यांनी सर्वांना शांत करून निवडणुकीचा कार्यक्रम सुरु केला.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.