जळगाव जिल्ह्यात महायुतीमध्ये बंडखोरी, स्वत:ला गिरीश महाजनांचे मानसपुत्र मानणारे अमोल शिंदे अपक्ष लढणार

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे अमोल शिंदे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध त्यांची बंडखोरी महायुतीसाठी धोकादायक ठरू शकते. त्यांचा दावा आहे की, जनतेच्या आग्रहामुळे ते अपक्ष निवडणूक लढत आहेत.

जळगाव जिल्ह्यात महायुतीमध्ये बंडखोरी, स्वत:ला गिरीश महाजनांचे मानसपुत्र मानणारे अमोल शिंदे अपक्ष लढणार
Follow us
| Updated on: Oct 27, 2024 | 8:15 PM

खेमचंद कुमावत, Tv9 प्रतिनिधी, जळगाव : जळगाव जिल्ह्यात महायुतीमध्ये बंडखोरी होताना दिसत आहे. मंत्री गिरीश महाजन मला मानसपुत्र मानतात, असं वारंवार अमोल शिंदे यांच्याकडून बोलले जाते. अमोल शिंदे हे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात. हेच भाजपचे अमोल शिंदे पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातून उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत देखील अमोल शिंदे यांनी बंडखोरी करत दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य मिळवले होते. पाचोरा-भडगाव मतदारसंघातून महायुतीकडून विद्यमान आमदार किशोर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमोल शिंदे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे महायुतीच्या उमेदवाराचे टेन्शन वाढणार आहे. कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत अमोल शिंदेंनी बंडखोरी केली होती. ते अवघ्या 1500 मतांनी पराभूत झाले होते.

अमोल शिंदे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “जनतेचा सेवक म्हणून, जनतेच्या आशीर्वादावर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. एक निष्ठा आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांचे संघटन माझ्याकडे असल्याने 24 तास जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काम केलं आहे आणि याच विश्वासावर लाखाची मतं घेऊन आम्ही यावेळची निवडणूक जिंकू. मागच्या वेळपेक्षा यावेळची परिस्थिती मला अनुकूल आहे. मागच्या वेळेस विद्यमान आमदार महायुतीकडून तर माजी आमदार आघाडीकडून उभे होते आणि यावेळी त्यांच्यातील मतांचे विभाजन झाले आहे”, असं अमोल शिंदे म्हणाले.

‘मला नाही वाटत की माझा पक्ष माझी हाकालपट्टी करेल’

“गिरीश महाजनांचा मी मानसपुत्र आहे. तसेच पक्षश्रेष्ठींविषयी एक वेगळी भावना माझ्या मनामध्ये आहे. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन लोकांच्या आग्रहामुळे मी ही निवडणूक अपक्ष लढणारच आहे. माझी हकालपट्टी करणे हा आमदारांचा विषय नाही. हा माझ्या पक्षाचा विषय आहे. मला नाही वाटत की माझा पक्ष माझी हाकालपट्टी करेल. पाचोरा भडगाव मतदारसंघाची जागा भारतीय जनता पार्टीने स्वतः करिता मागितली होती. आमदारांना पाचोरा-भडगाव मतदार संघातील जनतेने स्पष्टपणे नाकारलं आहे”, असा दावा अमोल शिंदे यांनी केला.

‘भाजपने जागा मागितली होती, पण…’

“पाच सर्व्हे झाले, पोलीस स्टेशनचा रिपोर्ट होता, मीडियाचे सर्व्हे झालेत. आमदारांना इथल्या जनतेने स्पष्टपणे नाकारलं आहे. पाचोरा भडगाव मतदारसंघाची जागा आमदारांच्या नावाने निवडून येणे शक्य नव्हतं म्हणून भारतीय जनता पार्टीने ही जागा आग्रहपूर्वक मागण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवी वरच्या घडामोडींना यामध्ये यश आले नाही. भारतीय जनता पार्टीने अमोल शिंदे याच नावाने ही जागा मागितली होती. मात्र मिळाली नाही. या निवडणुकीत अमोल शिंदे जळगाव जिल्ह्यात मोठ्या मताधिक्याने निवडून येईल असा दृढ विश्वास मला आहे”, अशी प्रतिक्रिया अमोल शिंदे यांनी दिली.

Non Stop LIVE Update
मोहोळमध्ये सर्वात कमी वयाच्या उमेदवार, सिद्धी कदम आहे तरी कोण?
मोहोळमध्ये सर्वात कमी वयाच्या उमेदवार, सिद्धी कदम आहे तरी कोण?.
शरद पवारांची खेळी, आमदाराची ‘लाडकी लेक’ उतरवली विधानसभेच्या मैदानात
शरद पवारांची खेळी, आमदाराची ‘लाडकी लेक’ उतरवली विधानसभेच्या मैदानात.
नवाब मलिकांच्या लेकीविरूद्ध 'या' अभिनेत्रीचा पती निवडणुकीच्या रिंगणात
नवाब मलिकांच्या लेकीविरूद्ध 'या' अभिनेत्रीचा पती निवडणुकीच्या रिंगणात.
एकनाथ शिंदेंना धक्का, शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत माजीमंत्र्याची घरवापसी
एकनाथ शिंदेंना धक्का, शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत माजीमंत्र्याची घरवापसी.
“एकाचं कल्याण करून दिल्लीला पाठवलं तर दुसऱ्याचं बिस्मिल्ला करून...”
“एकाचं कल्याण करून दिल्लीला पाठवलं तर दुसऱ्याचं बिस्मिल्ला करून...”.
जयंत पाटलांकडून तिसरी यादी जाहीर, आणखी 9 शिलेदार विधानसभेच्या रिंगणात
जयंत पाटलांकडून तिसरी यादी जाहीर, आणखी 9 शिलेदार विधानसभेच्या रिंगणात.
संजय शिरसाट अचानक जरांगेंच्या भेटीला,अंतरवालीत दोघांत काय झाली चर्चा?
संजय शिरसाट अचानक जरांगेंच्या भेटीला,अंतरवालीत दोघांत काय झाली चर्चा?.
आमचा कारभार जनतेतून, मी पहाटे उठून..., हर्षवर्धन पाटलांचा दादांना टोला
आमचा कारभार जनतेतून, मी पहाटे उठून..., हर्षवर्धन पाटलांचा दादांना टोला.
'अटक मला करा...', जयश्री थोरातांसह 50 जणांवर गुन्हा, काय आहे प्रकरण?
'अटक मला करा...', जयश्री थोरातांसह 50 जणांवर गुन्हा, काय आहे प्रकरण?.
अजित दादा गटाची तिसरी यादी जाहीर; या उमेदवारांना विधानसभेच मिळाल तिकीट
अजित दादा गटाची तिसरी यादी जाहीर; या उमेदवारांना विधानसभेच मिळाल तिकीट.