Aashish Shelar | OBC आरक्षणाला नख लावण्याचं आघाडी सरकारचं षडयंत्र, भाजपा नेते आशिष शेलार यांचा आरोप

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अडिच वर्षापूर्वी सरकारला सांगितले होते मागासवर्ग आयोग गठीत करा, ट्रिपल टेस्ट करा, पण सरकारने ऐकले नाही.अलिकडेच आयोग गठीत करण्यात आला, तर जो अंतिम अहवाल दिला तो न्यायालयाने फेकून दिला. त्यामुळे आघाडी सरकारने नियोजनबद्ध षडयंत्र रचून ओबीसी आरक्षणाला नख लावलंय, असा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

Aashish Shelar | OBC आरक्षणाला नख लावण्याचं आघाडी सरकारचं षडयंत्र, भाजपा नेते आशिष शेलार यांचा आरोप
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 4:53 PM

मुंबईः ओबीसी आरक्षणाला नख लावण्याचे आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi) षडयंत्र होते, हे आम्ही वारंवार सांगत होतो. ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत (OBC reservation) गेल्या अडीच वर्षातील घटनाक्रम पाहिला तर हे एक नियोजनबध्द षडयंत्र होते हे उघड झालेय. याबाबत न्यायालयात जाणारा याचिकाकर्ता हा काँग्रेसचा कार्यकर्ता असून मंत्री आणि प्रदेशाध्यक्षांच्या कुणाच्या जवळचा आहे? राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अडिच वर्षापूर्वी सरकारला सांगितले होते मागासवर्ग आयोग गठीत करा, ट्रिपल टेस्ट करा, पण सरकारने ऐकले नाही.अलिकडेच आयोग गठीत करण्यात आला, तर जो अंतिम अहवाल दिला तो न्यायालयाने फेकून दिला. त्यामुळे आघाडी सरकारने नियोजनबद्ध षडयंत्र रचून ओबीसी आरक्षणाला नख लावलंय, असा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारत बुधवारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम पुढील दोन आठवड्यात जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे. याविरोधात भाजप नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

आरक्षणाशिवाय निवडणूक, भाजपची भूमिका काय?

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. ओबीसी समाजाला प्रतिनिधीत्व देण्यासाठी भाजपने यावर पक्षांतर्गत तोडगा काढल्याचंही आशिष शेलार यांनी सांगितलं. ते म्हणाले, ‘ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक होणे आम्हाला मान्य नाही. पण जर निवडणूका झाल्या तर भाजपाने पक्षांतर्गत निर्णय घेतला असून आरक्षणा एवढ्या किंबहुना जास्तच जागा भाजप ओबीसी समाजाला देईल,असे भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले.

‘हिंदू मंदिरांच्या अधिकारांना नख लावू नका’

खा. संजय राऊत आणि काँग्रेस प्रवक्ते यांना ज्या हिरव्या उचक्या लागल्या आहेत. त्यामुळे भाजपाची भूमिका स्पष्ट करतो असे सांगून आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले की,प्रार्थना स्थळ आणि शक्तीपीठ, तीर्थस्थान यामध्ये फरक आहे. मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढावे लागले, कमी झाले म्हणून आता हिंदू मंदिरांच्या अधिकारांना ठाकरे सरकार नख लावण्याचे काम करते आहे. आम्हाला ते मान्य नाही. महाराष्ट्र ही सुलतानाची भूमी नसून संतांची भूमी आहे. त्यामुळे शक्तीपीठ आणि तीर्थस्थानांच्या ठिकाणी सुचना देण्यासाठी, धार्मिक कार्यक्रमांसाठी लाऊडस्पीकरची आवश्यकता आहे. या हिंदू मंदिरांच्या अधिकाराला नख लावू नका.अन्यथा जनप्रक्षोभ होईल, हिंदू मंदिरांच्या अधिकारांसाठी भाजपा आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी दिला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.