Bhalchandra Nemade | ‘औरंगजेबाच्या राण्यांना भ्रष्ट केलं म्हणून…’ भाजपाकडून भालचंद्र नेमाडें विरोधात तक्रार
Bhalchandra Nemade | दादर येथे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कार्यक्रमात बोलताना भालचंद्र नेमाडे यांनी काही वक्तव्य केली. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. औरंगजेब, पेशव्या संदर्भात नेमाडे यांनी ही वक्तव्य केली.
मुंबई : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपाच्या सोशल मीडिया आणि कायदेशीर सल्लागार सेलचे प्रमुख आशुतोष दुबे यांनी सोमवारी भोईवाडा पोलीस ठाण्यात भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. शनिवारी दादर येथे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कार्यक्रमात बोलताना भालचंद्र नेमाडे यांनी केलेल्या काही वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.
आशुतोष दुबे यांनी भालचंद्र नेमाडे यांच्यावर हिंदू ब्राह्मणांच्या भावना दुखावण, लोकांना चिथावणी देणं आणि सार्वजनिक सदभावना बिघडवल्याचा आरोप केला आहे. भारतीय दंड विधान संहितेच्या कलमातंर्गत योग्य ती कारवाई करण्याची विनंती त्यांनी मुंबई पोलिसांना केली आहे.
I have lodged a complaint at Bhoiwada Police Station against Mr. Bhalchandra Nemade, a writer, for his hate speech of Outraging Hindu Brahmin’s, manipulating the Gyanvapi case, and provoking the public, thereby disturbing public harmony.
I request @MumbaiPolice to take… pic.twitter.com/IHaSHHRvvi
— ADV. ASHUTOSH J. DUBEY ?? (@AdvAshutoshBJP) August 7, 2023
भालचंद्र नेमाडे यांनी काय वादग्रस्त वक्तव्य केली?
भालचंद्र नेमाडे यांनी जाहीर कार्यक्रमात औरंगजेब, ब्राह्मण आणि पेशव्यांवर उघडपणे वक्तव्य केली. दुसऱ्या बाजीरावाने महाराष्ट्र इंग्रजांच्या हातात सोपवला, असे नेमाडे म्हणाले. औरंगजेबाला दोन हिंदू राण्या होत्या. त्या काशीला गेल्या होत्या, त्यावेळी हिंदू पंडितांनी त्यांचं अपहरण करून त्यांना भ्रष्ट केलं. म्हणून औरंगजेबाने मंदिर फोडली, अशी वक्तव्य भालचंद्र नेमाडे यांनी केली होती. भाजपा नेत्यांनी त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला व आता तक्रार नोंदवली आहे.