गुटखा खा सांगणाऱ्या आव्हाडांवर गुन्हा दाखल करा, अतुल भातखळकर यांची मागणी

पानपराग खा गुटखा खा सांगणाऱ्या आव्हाडांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केलीय. ते मुंबईत बोलत होते.

गुटखा खा सांगणाऱ्या आव्हाडांवर गुन्हा दाखल करा, अतुल भातखळकर यांची मागणी
ATUL BHATKHALKAR AND JITENDRA AWHAD
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 4:43 PM

मुंबई : शांत राहण्यायासाठी गुटखा, रजीनगंधा हवं ते खा, असा अजब सल्ला गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. जे स्वत:च मारहाणीच्या प्रकरणात जेलमध्ये जाऊन आलेले आहेत, ते शांत राहण्याचा सल्ला देत आहेत, असे म्हणत पानपराग खा गुटखा खा सांगणाऱ्या आव्हाडांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केलीय. ते मुंबईत बोलत होते.

आव्हाड यांची वागणूक हिटलप्रमाणे

जे स्वत:च मारहाणीच्या प्रकरणात जेलमध्ये जाऊन आलेले आहेत ते भिवंडीतील मुस्लीम बांधवांना शांत राहण्याचा सल्ला देत आहेत. जितेंद्र आव्हाड हे राज्यात मंत्री आहेत. डोक शांत ठेवायला मांस खाऊ नका असा ते अजब सल्ला दात आहेत. आव्हाड यांची वागणूक हिटलप्रमाणे आहे. हिटलदेखील पूर्ण शाहाकारी होता, असा टोला भातखळकर यांनी लगावला.

डोकी भडकावणाऱ्या रझा अकादमीवर बंदी घाला

तसेच पानपराग खा, गुटखा खा असे सांगणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवा. मुस्लीम बांधवांना सल्ला देण्यापेक्षा त्यांची डोकी भडकावणाऱ्या रझा अकादमीवर बंदी घाला. मगच तुम्हाला यावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे, असा सल्लादेखील त्यांनी आव्हाड यांना दिला.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले ?

जितेंद्र आव्हाड वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. भिवंडीमध्ये राष्ट्रवादी कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी एक वादग्रस्त विधान केले. त्यांनी डोकं शांत ठेवण्यासाठी रजनीगंधा, गुटखा, पानुसपारी खान्याचा सल्ला लोकांना दिला. “मी मुस्लीम बांधवांना विनंती करतो की, त्यांनी शांत राहावे, डोके गरम करून घेऊ नये. विरोधकांना तुमची डोके भडकवयाची आहेत. त्यामध्ये त्यांचा मोठा राजकीय स्वार्थ आहे. पण तुम्ही शांत रहा. डोके थंड ठेवण्यासाठी मांस कमी खा, तोंडात रजनीगंधा, गुटखा, पानमसाला हवे ते ठेवा, मात्र शांत रहा,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

इतर बातम्या :

ऑनलाईन ओळख, लग्नाच्या बेडीत अडकवून 8 दिवसात छूमंतर, नवरदेव कसा अडकला जाळ्यात?

VIDEO: ठाकरे सरकार म्हणजे अहंकार… अहंकार… अहंकार असलेलं सरकार; आशिष शेलारांचा घणाघात

आईच्या मृतदेहावर छातीला बिलगलेली 9 महिन्यांची पोर, पायाला काच रुतून जखमी, अमरावतीतील अंगावर काटा आणणारा प्रसंग

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.