काँग्रेसच्या काळातील योजना खड्ड्यात घालण्यासाठी होत्या का?; राज ठाकरे यांना कुणी केला सवाल?
विद्यापीठ सिनेट निवडणूकीत पदवीधरांची नोंदणी व्हावी लागते तेव्हा ही निवडणूक जिंकता येते.या निवडणूकीत जो जादा नोंदणी करतो तो निवडून येतोच. ही काही जनरल निवडणूक नाही. गावागावाची निवडणूक नाही असे या नेत्याने म्हटले आहे.
विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशाच्या धर्तीवरील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने आणली आहे. या योजनेवरुन दोन्ही बाजूंनी राजकारण सुरु आहे. या योजनेचे लाभार्थी वाढण्यासाठी तसेच अधिकाअधिक हप्ते वितरीत होण्यासाठी लाभ पदरात पाडण्यासाठी विधानसभेच्या निवडणूका देखील पुढे ढकल्यात आल्याचे म्हटले जात आहे. यावरुन राज ठाकरे यांनी अमरावती दौऱ्यात या योजनेने राज्य खड्ड्यात घालणे योग्य नसल्याची टीका केली आहे, त्याला आता महायुतीतील भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार उत्तर दिले आहे.
राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रीया देताना भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की इंदिरा गांधीच्या काळापासून संजय गांधी योजना सुरू आहे, अनेक राज्यात अशा योजनाद्वारे लोकांना मदत करण्याचा प्रयत्न असतो, तर काँग्रेसच्या काळात योजना झाल्या त्या राज्याला खड्यात घालण्यासाठी होत्या का ? असाही सवाल राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना बावनकुळे यांनी केला आहे. मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारने ही योजना सुरू केली, ‘लाडली बहेना’योजनेने संपूर्ण मध्यप्रदेशामध्ये परिवर्तन झाले. आर्थिक परिवर्तन झाले. मध्यप्रदेशातील मार्केटमध्ये हा पैसा आला. तसंच आता एक कोटी दोन कोटी नाही. मुख्यमंत्री लाडकी बहिणीचा 96 हजार कोटी रुपये येणार आहेत आणि महाराष्ट्राला ही योजना मजबुती देणार आहे. ग्रामीण भागाला मजबूत करणारी ही योजना आहे या योजनेत महाराष्ट्राला मजबुती मिळणार असल्याचे बावणकुळे यांनी म्हटले आहे.
मोठ्या प्रमाणात उद्योग महाराष्ट्रमध्ये आले आहेत. इन्व्हेस्टमेंट वाढली आहे. दोन्ही करावं लागतं. आर्थिक स्थिती ज्या परिवाराची मजबूत नाही त्यांना मदतही करावी लागते. इंडस्ट्री आणावी लागते दोन्हीकडे सरकार काम करीत आहे. एकीकडे लाडक्या बहिणीला 18 हजार रुपये वर्षे दोन बहिणी असेल तर 36 हजार रुपये हा मोठा आधार आहे. त्यातले 3 हजार जरी इन्शुरन्सला गेले तरी पूर्ण परिवाराचे रक्षण होऊ शकतं. lic च्या माध्यमातून एकीकडे आधार देणे महत्वाचे आहे. रस्ते, वीज, पाणी आपण करतो. तसेच एकीकडे आधार देणे महत्वाचे आहे. व्यक्तिगत स्वरूपात मदत देणे गरजेचे आहे. एका गावात लाडक्या बहिणीचे दीडशे लाभार्थी असतील तर त्यांनी वस्तू खरेदी केल्या की हे पैसे मार्केटमध्ये येणार, त्यामुळे अशा योजनेची गरज असल्याचे बावणकुळे यांनी सांगितले.
मविआला मते म्हणजे योजना बंद
लोकसभा निवडणूकांचा जसा विधानसभाशी संबंध नाही, तसेच सिनेटचे मुद्दे वेगवेगळे असतात असे सांगत बावणकुळे पुढे म्हणाले की मी दाव्याने सांगतो आज यवतमाळ विधानसभा आढावा घेतला 51 टक्के मतं घेत यवतमाळ जागा जिंकेल आणि महाराष्ट्रमध्ये महायुतीचे सरकार येईल. 100 टक्के जनता पाठीशी उभी राहिली तर डबल इंजिनचा सरकार येईल. केंद्रात 2029पर्यंत सरकार आहे राज्यात सरकार आले तर केंद्रातील सर्व योजना सुरू राहतील. मविआला मत देणे म्हणजे या सर्व योजना बंद करणे आणि महायुतीला मत देणे म्हणजे योजना सुरू राहणे असं आहे. त्यामुळे जनतेने हे मनात घेतले आहे महाराष्ट्रामध्ये महायुती निवडून येणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.