‘…तर तुमचं डोकं ठिकाणावर येईल’, चंद्रशेखर बावनकुळे यांची थेट शरद पवारांवर टीका

सोलापूरच्या मारकडवाडी गावात झालेल्या निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. शरद पवार यांनी याबाबत चिंता व्यक्त केली असून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागील निवडणुकीच्या आकडेवारीचा दाखला देत प्रत्युत्तर दिले आहे. बावनकुळे यांनी मारकडवाडी गाव कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी नसल्याचे म्हटले आहे.

'...तर तुमचं डोकं ठिकाणावर येईल', चंद्रशेखर बावनकुळे यांची थेट शरद पवारांवर टीका
शरद पवार, चंद्रशेखर बावनकुळेImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Dec 08, 2024 | 4:24 PM

सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी हे गाव सध्या राजकारणाचं केंद्र बनलं आहे. या भागात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर हे विजयी झाले आहेत. पण तरीही मतदारसंघातील मारकडवाडी गावात भाजप उमेदवार राम सातपुते यांना जितके मतं मिळाली तेवढे सुद्धा मतदान झालेले नाही, असा दावा उत्तम जानकर आणि गावकऱ्यांचा आहे. गावकऱ्यांनी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे गावकऱ्यांनी खरं-खोटं सिद्ध करण्यासाठी गावात थेट बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा प्रयत्न केला. पण प्रशासनाच्या दबावामुळे ते शक्य होऊ शकलं नाही. यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे आज मारकडवाडी गावात पोहोचले. त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याबाबतचा संशय व्यक्त केला. त्यांच्या आरोपांवर आणि टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी कायम वेगवेगळ्या पक्षांना साथ दिली, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. बावनकुळे यांनी मतांची आकडेवारी ट्विट करत शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं. “मारकडवाडी गाव हे शरद पवार किंवा उत्तमराव जानकरांची मक्तेदारी नाही. पवार साहेब, मारकडवाडी येथे झालेल्या मतांची आकडेवारी बघा म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर येईल. शरद पवारांनी उगाच भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नये”, अशा शब्दांत बावनकुळेंनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘एक्स’वरून शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. “शरद पवार साहेब मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी कायम वेगवेगळ्या पक्षांना साथ दिली. तुमच्या माहितीसाठी २०१४, २०१९ आणि २०२४ ची मतांची आकडेवारी देत आहे, जरा डोळे उघडून नीट वाचा. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांना ५३३ मतं मिळाली तर महायुतीतील घटकपक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांना ६६४ मतं मिळाली होती. त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या हनुमंत डोळस यांना २९४ मते मिळाली तर अपक्ष अनंत खंडागळे यांना ९७९ मते मिळाली”, असं बावनकुळे म्हणाले.

“२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रणजितसिंह निंबाळकर यांना ९५६ मतं मिळाली तर राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांना ३९५ मतं मिळाली. मात्र त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीकडून लढलेल्या उत्तमराव जानकर यांना १३४६ मतं मिळाली तर भाजपाकडून लढलेल्या राम सातपुते यांना ३०० मतं मिळाली”, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.

‘हे गाव कुणा एकाची मक्तेदारी नाही’

“२०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या धैर्यशील मोहिते पाटील यांना १०२१ मतं तर भाजपाच्या रणजितसिंह निंबाळकर यांना ४६६ मतं मिळाली विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उत्तमराव जानकर यांना ८४३ मतं तर भाजपच्या राम सातपुते यांना १००३ मतं मिळाली. या आकडेवारीवरून स्पष्ट होत की, मारकडवाडी ग्रामस्थांनी कधी राष्ट्रवादीला साथ दिली, कधी अपक्ष तर कधी भाजपाला साथ दिली. त्यामुळे हे गाव कुणा एकाची मक्तेदारी नाही”, असं जोरदार प्रत्युत्तर बावनकुळे यांनी दिलं.

“यावेळी लोकांनी आणि लाडक्या बहिणींनी तुम्हाला नाकारलं. त्यामुळे उगाच भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नका. जरा मारकवाडी येथे झालेल्या मतांची आकडेवारी डोळे उघडून वाचा म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर येईल”, अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुनावलं.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.