‘महाराष्ट्राच्या समोर सांगते, मी तिला मदत केली’, विद्या चव्हाण यांच्या आरोपांवर चित्रा वाघ यांची कबुली, पण…

विद्या चव्हाण यांनी केलेल्या गंभीर आरोपांवर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे. विद्या चव्हाण यांच्या सूनेला मदत केल्याचं चित्रा वाघ यांनी मान्य केलं आहे. विद्या चव्हाण यांच्या आरोपांनंतर लगेच पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांनी भूमिका मांडली.

'महाराष्ट्राच्या समोर सांगते, मी तिला मदत केली', विद्या चव्हाण यांच्या आरोपांवर चित्रा वाघ यांची कबुली, पण...
चित्रा वाघ आणि विद्या चव्हाण
Follow us
| Updated on: Jul 30, 2024 | 5:02 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले. चित्रा वाघ यांनी आपल्या कुटुंबातील वादाचा फायदा घेत सूनेला भडकवलं. तसेच त्या माध्यमातून आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला. विद्या चव्हाण यांनी यावेळी चित्रा वाघ आणि सूनेच्या संभाषणाचे ऑडिओ क्लिप ऐकवल्या. विद्या चव्हाण यांच्या आरोपांना चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं. “मी महाराष्ट्राच्या समोर सांगते, मी तिला मदत केली”, असं चित्रा वाघ यांनी कबूल केलं. यावेळी चित्रा वाघ यांनी विद्या चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले.

“मार्च २०२० मध्ये एक डॉक्टर माझ्याकडे आले होते. त्यांनी सांगितलं एका महिलेला त्रास होत होता. तिथे यांची सून आली होती. तिचे बाबा पण आले होते. त्यांनी सांगितलं त्यांच्या मुलीसोबत काय काय केलं. तिच्यावर गलिच्छ आरोप केला. त्यांना पहिला मुलगा हवा होता. पण मुलगी झाली. नंतर दुसरीपण मुलगी होती. तिची डेथ झाली. डॉक्टरांनी सांगितलं आता तिला मुल होऊ शकत नाही. असं गौरीने सांगितलं. त्याच्यानंतर तिचा छळ सुरु झाला. असं त्या मुलीने आणि तिच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं. कशा पद्धतीने शिवीगाळ होते, मारहाण होते. या बाईच्या धाकट्या मुलाने वहिणीवर हात टाकला. तिचा विनयभंग केला. तिने जेव्हा हे घरी सांगितलं तेव्हा विद्या चव्हाण यांनी म्हटलं घरात या गोष्टी होतात. या गोष्टी बाहेर काढायच्या नाहीत. पोलिसात तक्रार करायला गेले तर पोलिसांनी हाकलून दिलं”, असा गंभीर आरोप चित्रा वाघ यांनी केला.

‘विद्या चव्हाण हा जर अपराध असेल तर…’

“ज्या वेळेला मेडिकल सर्टिफिकेट घेऊन गेले. एफआयआर लिहित असताना मुलीला विद्या चव्हाण यांनी तिला धमकी दिली. हे थांबवलं नाही तर तुझ्या मुलीला आणि तुझ्या जीवाला धोका आहे. या बाईने आपल्या नातवाला आईपासून वेगळं केलं. ही मला शहाणपणा शिकवणार? ती पवार साहेबांकडे देखील गेली. पण काहीही रिस्पॉन्स मिळाला नाही. जयंत पाटील यांच्याकडे गेली कोणताही रिस्पॉन्स दिला नाही. मुलगी ज्या अवस्थेत आली होती तिची अवस्था बघवत नव्हती. मुलगी डॉक्टर आहे. सुशिक्षित आहे. तिला बाळकडू पाजायची गरज नाही. हो केलं मी तिला गाईड. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. तुमच्याबद्दल कला मला माहित आहे. रडून रडून सून बेहाल झाली होती. विद्या चव्हाण हा जर अपराध असेल तर हजार अपराध मी करेल. मी महाराष्ट्राच्या समोर सांगते मी तिला मदत केली”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

‘मुलीला वेगळं केलं, त्याची हाय तुम्हाला लागली’

“विद्या चव्हाण तुम्ही सगळ्या केस हारल्या आहेत. ती मुलगी आता तिच्या आईकडे आहे. मी तिला गाईड केलं यात काय चुकलं? मी पण आई आहे. बाईची व्यथा समजते. मुलीला वेगळं केलं, त्याची हाय तुम्हाला लागली आहे. आज ते लेकरु आईच्या कुशीत आहे. मला त्याचा अभिमान आहे. एखाद्या बाईवर जर अन्याय होत असेल तर त्यांना सहकार्य, मदत मी करत राहणार. पुन्हा माझ्या नादी लागायचं नाही. पुन्हा असे फुसके बॉम्ब सोडू नका. जे केलं त्याचा अभिमान आहे मला”, अशी भूमिका चित्रा वाघ यांनी मांडली.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.