गुलाबराव पाटलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, हेमा मालीनींच्या गालाच्या वक्तव्याने वादात
गुलाबराव पाटलांनी आपल्या भाषणात बोलताना परिसरातले रस्ते हे हेमा मालीनींच्या गालासारखे गुळगुळीत झाले आहे, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यातील महिला आयोग आणि भाजपच्या नेत्या आक्रमक झाल्या आहेत.
मुंबई : हेमा मालीनींच्या गालांवरून गुलाबरावा पाटलांनी एक वक्तव्य केले आणि राज्यभर वाद सुरू झाला. गुलाबराव पाटलांनी आपल्या भाषणात बोलताना परिसरातले रस्ते हे हेमा मालीनींच्या गालासारखे गुळगुळीत झाले आहे, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यातील महिला आयोग आणि भाजपच्या नेत्या आक्रमक झाल्या आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे.
गाल पाहणाऱ्याचे थोबाड फोडू
शिवीगाळ करणारे संजय राऊत उजळ माथ्याने फिरत आहेत. गुलाबराव पाटलांना हेमा मालीनींचे गाल दिसत आहेत. पण राज्यातल्या पोलीस यंत्रणेला यात महिलांचा विनयभंग दिसत नाही, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. इतकेच नाही तर गुलाबराव पाटील यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा. नाहीतर गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. असा इशाराही भाजप महिला आघाडीकडून देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातले राजकारण पुन्हा तापले आहे.
हेमा मालीनी काय म्हणाल्या?
गुलाबराव पाटलांनी केलेल्या वक्तव्यावर खासदार हेमा मालीनी यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझे गाल आणि रस्त्यांची तुलना करण्याचा ट्रेंड लालू यादव यांनी काही वर्षांपूर्वी सुरू केला. त्यानंतर तो आजही सुरू आहे. सामान्य वक्तीने असे वक्तव्य केले तर जास्त काही बोलू शकत नाही, मात्र एखाद्या खासदार आमदाराने असे बोलणे योग्य नाही, असेही त्या म्हणाल्या.
#WATCH “A trend of such statements was started by Lalu Ji years ago and many people have followed this trend. Such comments are not in a good taste,” says BJP MP Hema Malini on Maharashtra minister Gulabrao Patil comparing roads to her cheeks pic.twitter.com/SJg5ZTrbMw
— ANI (@ANI) December 20, 2021
गुलाबराव पाटलांनी माफी मागितली
या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी माफी मागितली आहे. रस्ते चांगले असावेत असा माझ्या बोलण्यामागचा उद्देश होता, असे स्पष्टीकरणही दिले आहे. हेमा मालीनी आणि इतर महिलांविषयी माझ्या मनात नेहमी आदार आहे, कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो अशा शब्दात त्यांनी माफी मागितली आहे.