संजय राठोड यांना शरीरसुख आरोप प्रकरणात क्लीनचीट, पण मधल्या दिवसांत बऱ्याच गोष्टी घडल्या ? चित्रा वाघ म्हणतात…

माजी मंत्री संजय राठोड यांना पोलिसांनी क्लीनचीट दिल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला केलाय. संजय राठोड (Sanjay Rathore) यांच्या केसेसमध्येच ते निरपराध कसे आहेत हे सांगण्याचा यापूर्वीदेखील प्रयत्न झालाय. आताही तेच झालंय, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिलीय.

संजय राठोड यांना शरीरसुख आरोप प्रकरणात क्लीनचीट, पण मधल्या दिवसांत बऱ्याच गोष्टी घडल्या ? चित्रा वाघ म्हणतात...
Chitra-Wagh_Sanjay-Rathod
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 9:58 PM

मुंबई : माजी मंत्री संजय राठोड यांना पोलिसांनी क्लीनचीट दिल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला केलाय. संजय राठोड (Sanjay Rathore) यांच्या केसेसमध्येच ते निरपराध कसे आहेत हे सांगण्याचा यापूर्वीदेखील प्रयत्न झालाय. आताही तेच झालंय, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिलीय. तसेच संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचं पत्र जर खोडसाळपणा असेल तर तो कुणी व का केला ? हे शोधून काढावं अशी मागणी त्यांनी केली आहे. (BJP leader Chitra Wagh expressed doubts over police investigation on Sanjay Rathore molestation case)

 महिलेवर तसेच तिच्या परिवारावर प्रेशर टाकण्यात आल्याचं समजलं

“शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली, अशा आशयाचं पत्र यवतमाळ पोलिसांकडे आले. या पत्रात ज्या गोष्टी लिहून आलेल्या आहेत, त्यावर प्रश्न उपस्थित राहणे साहजिक होतं. या प्रकरणात राज्य सरकारने एसआयटी स्थापन करण्याचं ठरवलं. या मधल्या दिवसांमध्ये अनेक घडामोडी कानावर आल्या. त्यामध्ये महिलेवर तसेच तिच्या परिवारावर प्रेशर टाकण्यात आल्याचं समजलं. त्यानंतर ही महिला एका दिवशी येणार आहे, असं समजलं. नंतर महिलेची मनस्थिती नीट नसल्याचं सांगण्यात आलं. 14 तारखेला पुन्हा मनस्थिती नीट असल्याचे सांगितले गेले. पोलिसांनी या महिलेचा नंतर जबाब घेण्यात आला. त्यात तिने माझं नाव वापरलं गेलं, कोणीतरी खोडसाळपणा केला, असं महिलेने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. संजय राठोड यांच्याबाबत यापूर्वीदेखील असंच झालं आहे,” असे चित्रा वाघ म्हणाल्या.

महिलेची राठोड यांच्याविषयी काहीही तक्रार नाही

माजी मंत्री संजय राठोड यांना शरीरसुखाची मागणी केल्याच्या आपोपाप्रकरणी क्लीनचीट देण्यात आली आहे. यवतमाळ पोलिसांनी ही क्लीनचीट दिलेली आहे. नोकरी लावण्याचे अमिष दाखवून एका महिलेला शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप राठोड यांच्यावर करण्यात आला होता. पोलिसांना पाठवण्यात आलेल्या अर्जामध्ये महिलेच्या पतीचे नाव चुकलेले आहे. तसेच त्या अर्जावरील सही अर्जात नमुत केलेल्या महिलेची नाही. महिलेची राठोड यांच्याविषयी काहीही तक्रार नाही, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

यवतमाळ पोलिसांनी काय सांगितले ?

विशेष चौकशी पथकाने केलेल्या चौकशीअंती माजीमंत्री व आमदार संजय दुलीचंद राठोड यांच्याविरुद्ध करण्यात आलेला तक्रार अर्ज महिलेने स्वतः पाठविलेला नाही. या अर्जामध्ये महिलेच्या नावाचा वापर करण्यात आला आहे. अर्जावरील सही त्या महिलेची नाही. महिलेच्या पतीचे नावसुद्धा चुकीचे टाकलेले आहे. त्यामुळे महिलेच्या नावाने पाठवलेला अर्ज खोटा आहे. महिलेची आमदार संजय दुलीचंद राठोड यांच्याविषयी काही तक्रार नाही. नमूद महिलेच्या नावाने कुणीतरी खोडसाळपणे स्पीडपोस्टाने हा तक्रार अर्ज केल्याचे निष्पन्न झालेले आहे. अर्जात नमुद केलेल्या महिलेचा व महिलेच्या कुटुंबाचा तक्रार अर्जाशी काहीएक संबंध नाही, असे यवतमाळचे एसपी दिलीप पाटील यांनी सांगितले आहे.

इतर बातम्या :

बैलगाडा शर्यतीबाबत आता शिवसेना नेत्याचाच इशारा! गृहमंत्र्यांना 15 दिवसांचं अल्टिमेटम

रक्तानं लिहिलेल्या पत्राद्वारे कार्यकर्त्याच्या अजित पवारांना शुभेच्छा! सच्च्या कार्यकर्त्याला अजितदादांचाही प्रेमाचा सल्ला

तेव्हा शरद पवारांबाबत कळलं नव्हतं का?; हसन मुश्रीफ यांचा राज ठाकरेंना सवाल

(BJP leader Chitra Wagh expressed doubts over police investigation on Sanjay Rathore molestation case)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.