Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis | ‘असच पत्र त्यांनी स्वत:ला 25 वर्ष लिहायला हवं होतं’, देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार, VIDEO

Devendra Fadnavis | 'रोज ते तुमच्यावर बोट उचलतील, तुम्ही त्यांन संधी देऊ नका'. "मी चहल यांना सांगीन, की तुम्ही चांगल काम करताय. एक बरं आहे, निंदकाच घर असावे शेजारी, आपल्या शेजारी ते बसले आहेत"

Devendra Fadnavis | 'असच पत्र त्यांनी स्वत:ला 25 वर्ष लिहायला हवं होतं', देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार, VIDEO
devendra fadnavis
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 11:47 AM

मुंबई : ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे सातत्याने मुंबईच्या विकासकामांशी संबंधित मुद्दे उपस्थित करत आहेत. राज्य सरकार विकास कामात कसं कमी पडतय, ते दाखवून देण्याचा आदित्य ठाकरे यांचा प्रयत्न आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोल नाके बंद करण्याची मागणी केली होती. त्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं होतं. तोच धागा पकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला.

मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरे सातत्याने राज्य सरकारला लक्ष्य करत असतात.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उत्तर

“सध्या चांगली कामं सुरु आहेत. त्यामुळे काहीच्या पोटात दुखत आहे. पोटात दुखत असल्याने काही लोक रोज पत्र लिहित आहेत” असं सांगून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मुंबईतील विकास कामांवरुन आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर काही दिवसांपूर्वी जोरदार टीका केली होती. त्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

‘काही लोकांच्या पोटात दुखतं’

“काँक्रिट रस्त्याची कामं चालली आहेत. अर्थात चांगली काम चालतात, तेव्हा काही लोकांच्या पोटात दुखतं, तेव्हा ते रोज एक पत्र लिहितात. अशाच प्रकारच एक पत्र त्यांनी स्वत:ला 25 वर्ष लिहिलं असतं, तर कदाचित मुंबई अधिक चांगली झाली असती” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ‘चहल तुम्ही चांगल काम करताय’

“मी चहल यांना सांगीन, की तुम्ही चांगल काम करताय. एक बरं आहे, निंदकाच घर असावे शेजारी, आपल्या शेजारी ते बसले आहेत. रोज ते तुमच्यावर बोट उचलतील, तुम्ही संधी देऊ नका. पारदर्शी, प्रामाणिकपणे काम करा. मुंबई बदलतेय, अशाच पद्धतीच काम केलत, तर खड्डेमुक्त मुंबईच मुख्यमंत्र्यांच स्वप्न तुम्ही पूर्ण करु शकता” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.