105 जागा जिंकायचं सोडा, पुढल्यावेळी शिवसेना एवढ्या जागा लढू तरी शकेल का? भाजपने राऊतांना डिवचले

आम्ही भाजपच्या आमदारांना घरी बसवून सत्तेत आलो, असे ते वारंवार सांगतात. मात्र, याला विश्वासघात करणे म्हणतात. | Keshav Upadhye

105 जागा जिंकायचं सोडा, पुढल्यावेळी शिवसेना एवढ्या जागा लढू तरी शकेल का? भाजपने राऊतांना डिवचले
Follow us
| Updated on: Dec 19, 2020 | 1:04 PM

मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही 105 जागा जिंकू, अशा गप्पा शिवसेनेकडून मारल्या जात आहेत. मात्र, पुढच्या निवडणुकीत शिवसेनेला 105 जागा लढायला तरी मिळतील का, असा खोचक सवाल विचारत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना लक्ष्य केले. (Verbal battle between BJP leader Keshav Upadhye and Sanjay Raut)

गेल्या निवडणुकीत भाजपला 105 जागा मिळाल्या होत्या. मात्र, आम्ही त्या 105 आमदारांना घरी बसवले. आगामी निवडणुकीत शिवसेनेचेही एवढे आमदार निवडून येतील, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. यावरुन केशव उपाध्ये यांनी राऊत यांनी लक्ष्य केले. संजय राऊत हे शिवसेना अजिंक्य असल्याचा दावा करतात. आम्ही भाजपच्या आमदारांना घरी बसवून सत्तेत आलो, असे ते वारंवार सांगतात. मात्र, याला विश्वासघात करणे म्हणतात. ज्या मित्रपक्षाच्या मदतीने तुम्ही निवडणूक जिंकलात त्यांचाच तुम्ही विश्वासघात केला, असा आरोप केशव उपाध्ये यांनी केला.

आता शिवसेना आगामी विधानसभा निवडणुकीत 105 आमदार निवडून आणण्याच्या गप्पा मारत आहे. मात्र, पुढच्या निवडणुकीत 105 आमदार निवडून यायचं सोडा पण शिवसेनेला महाविकासआघाडीत तेवढ्या जागा तरी मिळतील का, असा सवाल केशव उपाध्ये यांनी विचारला. महाविकासआघाडीत एकत्र निवडणूक लढवताना एवढ्या जागा मिळणार नाहीत, याची मानसिकता शिवसेनेने तयार करावी, असा सल्लाही उपाध्ये यांनी दिले.

‘मुंबई आपलं नाक आहे, महापालिका निवडणूक जिंकायचेय’

मुंबई हे आपलं नाक आहे. इतकी वर्षे मुंबईत शिवसेनेची ताकद राहिली आहे. त्यामुळे आता आपले प्राधान्य मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकण्याला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला वेगळ्याच साच्यात घडवले आहे. आता तो साचा कुठे मिळणार नाही. त्यामुळे देशात शिवसेना ही अजिंक्य आहे. त्यामुळे आपण 105 आमदारांना घरी बसवले ना. पुढल्या विधानसभेला शिवसेनेचे 105 आमदार असतील, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

सोनिया गांधींचं पत्रं म्हणजे दबावतंत्र नाही, राऊतांची सावध प्रतिक्रिया; शिवसेना बॅकफूटवर?

Congress : महाआघाडी सरकारमध्ये ऑल इज नॉट वेल? ठाकरे सरकारविरोधात काँग्रेसची चक्क दिल्लीत प्रेस कॉन्फरन्स?

‘शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा’, पडळकरांचं राऊतांना पत्र

(Verbal battle between BJP leader Keshav Upadhye and Sanjay Raut)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.