पोटात पाप म्हणूनच म्हणूनच मैं जेल में जाऊंगाचा आरडाओरडा, सोमय्यांचे मलिकांवर शरसंधान; चोरीचा माल वापस किया म्हणत राऊतांवर टीका

सोमय्या म्हणाले की, अनिल देशमुख यांना वाचविण्यासाठी ठाकरे सरकार, पवार साहेबांनी खूप प्रयत्न केले. मात्र, कोर्टाने त्यांना जेलमध्ये टाकले.

पोटात पाप म्हणूनच म्हणूनच मैं जेल में जाऊंगाचा आरडाओरडा, सोमय्यांचे मलिकांवर शरसंधान; चोरीचा माल वापस किया म्हणत राऊतांवर टीका
किरीट सोमय्या, नवाब मलिक आणि संजय राऊत.
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 3:23 PM

नाशिकः ज्याने भ्रष्टाचार केला असेल, त्याला भ्यावे आणि घाबरावे लागणारच. घोटाळेबाजांना महाराष्ट्राची जनता सोडणार नाही. ज्यांच्या पोटात पाप आहे, तेच लोक मैं जेल में जाऊंगा असा आरडाओरडा करतात, असा आरोप सोमवारी भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) केला. त्यांनी नवाब मलिक यांनी केलेले आरोप आणि ट्वीटला एका अर्थाने प्रत्युत्तर दिले.

मलिकांचे आरोप काय?

नवाब मलिकांनी आजही आपल्या घरावर ईडीची धाड पडणार असल्याचे मी ऐकले आहे. मी पाहुणे येण्याची वाट पाहत आहे. त्यांच्यासाठी चहा आणि बिस्किटे आणून ठेवली आहेत, असे म्हटले होते. त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला होता. फडणवीस हे तपास यंत्रणांना माझ्याविरोधात सूचना देत आहेत. त्यामुळे त्यांनी आता स्वत: तपास यंत्रणांचा ओएसडी बनावे आणि किरीट सोमय्या यांना या यंत्रणांचा प्रवक्ता बनवावे, असा टोला बीडमध्ये बोलताना लगावला होता. किरीट सोमय्या या बाजारातील बाराती आहेत, असा घणाघाती हल्लाही मलिक यांनी चढवला होता.

सोमय्यांचे प्रत्युत्तर

नवाब मलिकांच्या या आरोपाला किरीट सोमय्या यांनी इगतपुरीमध्ये प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ज्याने भ्रष्टाचार केला असेल, त्याला भ्यावे आणि घाबरावे लागणारच. घोटाळेबाजांना महाराष्ट्राची जनता सोडणार नाही. ज्यांच्या पोटात पाप आहे, तेच लोक मैं जेल में जाऊंगा असा आरडाओरडा करतात. त्यामुळे पहिले पोटातील पाप हलकं करा ना, असे आवाहनही त्यांनी केले.

जितेंद्र आव्हाड बेलवर

सोमय्या म्हणाले की, अनिल देशमुख यांना वाचविण्यासाठी ठाकरे सरकार, पवार साहेबांनी खूप प्रयत्न केले. मात्र, कोर्टाने त्यांना जेलमध्ये टाकले. आनंद अडसूळ जेलमध्ये आहेत. जितेंद्र आव्हाड बेलवर आहेत. पोलीस कमिशनर पोलिसही जेलमध्ये आहेत. त्यामुळे ही नौटंकी बंद करावी. संजय राऊत यांच्यासारखे करा. त्यांनी चोरीचा माल वापस किया म्हणत 55 लाख जाऊन परत दिले. मिलिंद नार्वेकरांनी स्वतःचा बंगला स्वतः पाडला, असा दावाही त्यांनी केला.

ज्याने भ्रष्टाचार केला असेल, त्याला भ्यावे आणि घाबरावे लागणारच. घोटाळेबाजांना महाराष्ट्राची जनता सोडणार नाही. ज्यांच्या पोटात पाप आहे, तेच लोक मैं जेल में जाऊंगा असा आरडाओरडा करतात.

-किरीट सोमय्या, भाजप नेते

इतर बातम्याः

Omicron| नाशिकमध्ये अजून एका कोरोना रुग्णाचा मृत्यू, 446 जणांवर उपचार सुरू, 341 संशयितांचे अहवाल प्रतिक्षेत

Nashik| अचाट खाणे न् मसणात जाणे…काय, तर टोमॅटोच्या कॅरेटमधून दारूची तस्करी, 15 लाखांचा साठा जप्त

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.