निलेश राणे यांचा शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता, महायुतीत पडद्यामागे काय घडतंय?

निलेश राणे कुडाळमधून इच्छूक असल्यामुळे नारायण राणेंनी शुक्रवारी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. निलेश राणेंच्या उमेदवारीवरुन दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मंगळवारी 15 ऑक्टोबरला नारायण राणेंनी वर्षा बंगल्यावर जात एकनाथ शिंदेंसोबतही कुडाळ मतदारसंघासंदर्भात चर्चा केली.

निलेश राणे यांचा शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता, महायुतीत पडद्यामागे काय घडतंय?
भाजप नेते निलेश राणे
Follow us
| Updated on: Oct 20, 2024 | 9:52 PM

भाजपचे नेते निलेश राणे 23 ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. निलेश राणे कुडाळमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. दरम्यान निलेश राणे निवडणुकीच्या मैदानात उतरल्यास कुडाळमध्ये ठाकरे गटाचे वैभव नाईक आणि निलेश राणेंमध्ये संभाव्य लढतीची शक्यता आहे. भाजप नेते निलेश राणे धनुष्यबाण हाती घेण्याची शक्यता आहे. निलेश राणेंनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तर सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. त्यामुळे निलेश राणे कुडाळमधून शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडणुकीच्या मैदान उतरणार असल्याची दाट शक्यता आहे.

निलेश राणेंनी धनुष्यबाण हाती घेतल्यास वैभव नाईक आणि निलेश राणे कुडाळमध्ये आमनेसामने येण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 पैकी 2 विधानसभा भाजप, तर एक जागा शिंदेंची शिवसेना लढणार असल्याचंही चित्र आहे. भाजपच्या दोन जागांपैकी कणकवलीच्या जागेवर नितेश राणेंची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

निलेश राणेंसाठी नारायण राणेंची फिल्डिंग

निलेश राणे कुडाळमधून इच्छूक असल्यामुळे नारायण राणेंनी शुक्रवारी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. निलेश राणेंच्या उमेदवारीवरुन दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मंगळवारी 15 ऑक्टोबरला नारायण राणेंनी वर्षा बंगल्यावर जात एकनाथ शिंदेंसोबतही कुडाळ मतदारसंघासंदर्भात चर्चा केली. 2 ऑक्टोबरला देखील नारायण राणेंनी वर्षा बंगल्यावर जात एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती.

2019 चा कुडाळचा निकाल काय?

2019 कुडाळ मतदारसंघातून ठाकरे गटाच्या वैभव नाईकांनी बाजी मारली होती. कुडाळमधून वैभव नाईकांविरोधात अपक्ष रणजित देसाई आणि काँग्रेसचे अरविंद मोंडकर मैदानात होते. या निवडणुकीत वैभव नाईक यांना 69 हजार 168 मतं मिळाली आहेत. अपक्ष रणजित देसाईंनी 54 हजार 819 मतं घेतली होती. तर काँग्रेसच्या अरविंद मोंडकर यांना 3 हजार 527 मतं मिळाली होती. 14 हजार 349 मतांनी वैभव नाईक यांचा विजय झाला. दरम्यान, कुडाळ नव्हे तर महायुतीत आणि मविआतही काही जागांवर अदलाबदल होण्याची शक्यता आहे.

मविआतही काही जागांवर अदलाबदल होण्याची शक्यता

भाजपचे सुजय विखे संगमनेरमधून शिंदेंच्या शिवसेनेतून, शिंदे गटाचे दीपक केसरकर सावंतवाडीतून भाजपच्या तिकीटावर, तासगावात भाजपचे निशिकांत पाटील घड्याळाच्या चिन्हावर लढणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर हे मशालीच्या चिन्हावर आणि जळगाव शहरातून ठाकरे गटाच्या इच्छूक नेत्या जयश्री पाटील तुतारीवर लढणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, नारायण राणेंनंतर निलेश राणेंनी देखील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलीय. त्यामुळे निलेश राणे कुडाळमधून धनुष्यबाणावर लढल्यास वैभव नाईकांना तगडं आव्हान देऊ शकतात.

Non Stop LIVE Update
मुंबईत एकाच घरात 2 भावांना उमेदवारी, भाजपकडून 99 जणांची पहिली यादी
मुंबईत एकाच घरात 2 भावांना उमेदवारी, भाजपकडून 99 जणांची पहिली यादी.
'अयोध्येच्या निकालावेळी देवापुढे बसलो अन्...',सरन्यायाधीश काय म्हणाले
'अयोध्येच्या निकालावेळी देवापुढे बसलो अन्...',सरन्यायाधीश काय म्हणाले.
भाजपच्या पहिल्याच यादीत या 99 उमेदवारांना वर्णी, बघा कोणाला संधी
भाजपच्या पहिल्याच यादीत या 99 उमेदवारांना वर्णी, बघा कोणाला संधी.
मनोज जरांगे पाटील अॅक्शन मोडमध्ये, मराठ्यांचे उमेदवार कुठे देणार?
मनोज जरांगे पाटील अॅक्शन मोडमध्ये, मराठ्यांचे उमेदवार कुठे देणार?.
काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद मिटणार? शरद पवार करणार मध्यस्थी?
काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद मिटणार? शरद पवार करणार मध्यस्थी?.
मनोज जरांगे पाटलांचा निर्धार, 'बदला घेणारच…आम्ही संपवणार म्हणजे...
मनोज जरांगे पाटलांचा निर्धार, 'बदला घेणारच…आम्ही संपवणार म्हणजे....
कुडाळच्या जागेवर राणे धनुष्यबाण चिन्हावर लढणार?लवकरच शिंदे गटात प्रवेश
कुडाळच्या जागेवर राणे धनुष्यबाण चिन्हावर लढणार?लवकरच शिंदे गटात प्रवेश.
शिवडीमध्ये कोणाची मशाल धगधगणार? समर्थकांमध्ये रंगतंय पोस्टर वॉर
शिवडीमध्ये कोणाची मशाल धगधगणार? समर्थकांमध्ये रंगतंय पोस्टर वॉर.
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, अन्...
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, अन्....
मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्यांची भेट
मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्यांची भेट.