श्री रामाच्या दर्शनासाठी कणकवलीतून दोन विशेष ट्रेन, भाजपा नेते नितेश राणे यांची घोषणा

अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन येत्या 22 जानेवारी 2024 मध्ये होणार आहे. या श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानंतर राममंदिराच्या दर्शनासाठी भाजपा नेते नितेश राणे यांनी कणकवली स्थानकातून दोन स्पेशल ट्रेन सोडण्याची घोषणा केली आहे.

श्री रामाच्या दर्शनासाठी कणकवलीतून दोन विशेष ट्रेन, भाजपा नेते नितेश राणे यांची घोषणा
BJP LEADER NITESH RANEImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Nov 11, 2023 | 3:00 PM

 विनायक डावरुंग, मुंबई | 11 नोव्हेंबर 2023 : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचा मुहू्र्त ठरला आहे. अयोध्येतील भव्य दिव्य श्री राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होत आले आहे. येत्या 22 जानेवारीला त्याचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनाचे रितसर निमंत्रण अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच देण्यात आले आहे. भाजपाने या सोहळ्याची वातावरण निर्मिती तयार करण्यास सुरुवात केली आहे. भाजपा नेते नितेश राणे यांनी राम मंदिराच्या सोहळ्यानंतर राम मंदिराच्या दर्शनासाठी शेकडो लोकांना अयोध्येत नेण्यासाठी भारतीय रेल्वेच्या दोन विशेष ट्रेन बुक केल्या आहेत. कणकवलीतून या दोन ट्रेन सोडण्यात येणार आहेत.

भाजपाकडून राम मंदिराच्या लोकार्पणाआधीच जय्यत तयारी सुरु केली आहे. येत्या 22 जानेवारी रोजी साधुसंतांच्या साक्षीने अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या श्रीराम मंदिराच्या भव्य उद्घाटन सोहळ्याला जगभरातून 130 देशांतून प्रतिनिधी, साधूसंत अयोध्येत येणार आहेत. श्रीराम मंदिराचे येत्या 22 जानेवारीला सकाळी उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम मंदिरात रामलल्ला विराजमान होणार आहेत. यासाठी आठ फूटांचे सोन्याचे सिंहासन तयार करण्यात आले असून रामलल्ला त्यावर विराजमान होणार आहेत. हा सोहळा अत्यंत नेत्रदीपक होणार आहेत. भाजपाने यासाठी खूप मोठी वातावरण निर्माण करण्याची तयारी केली आहे.

भाजपाची जोरदार तयारी

श्री रामाच्या दर्शनासाठी कोकणातून शेकडो रामभक्तांना नेण्यासाठी भाजपा नेते नितेश राणे यांनी जोरदार तयारी केली आहे. कणकवलीतून राम मंदिराच्या सोहळ्यानंतर कणकवली रेल्वे स्थानकातून दोन विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. या ट्रेनमधून कणकवली, देवगड आणि वैभववाडीच्या रामभक्तांसाठी विशेष व्यवस्था केली आहे. शेकडो रामभक्त श्रीरामाचा गजर करीत या ट्रेनमधून अयोध्येला रवाना होणार आहे अशी माहिती भाजपा नेते नितेश राणे यांनी केली आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.