Nitesh Rane | हिंदुंना मारून टाकेपर्यंत मजल जात असेल तर आमचेही हात बांधलेले नाही, कर्जत हल्ल्यावरून नितेश राणेंचा इशारा
कर्जतमधील युवकावर झालेल्या हल्ल्यानंतर इशारा देताना नितेश राणे म्हणाले, ' आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा देश आहे. अशा प्रकारे वारंवार हल्ले होत असतील. अमरावतीत हिंदुंना मारून टाकण्यापर्यंत मजल जात असेल तर आमचेही हात बांधेलेले नाहीत.
सिंधुदुर्गः हिंदुंना मारून टाकेपर्यंत तुमची मजल जात असेल तर आमचेही हात बांधलेले नाही, असा इशारा भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिलाय. कर्जत येथील एका व्यक्तीवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. अमरावतीत कोल्हे (Amravati kolhe murder) यांची ज्या प्रकारे हत्या झाली, तसाच प्रकार कर्जत येथे घडल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली. 10 ते 15 युवकांनी नुपूर शर्मांचा डीपी लावल्यामुळे तसेच अन्य काही कारणांमुळे कर्जत येथील युवकाला धारदार शस्त्राने (Karjat Attack) मारलं, त्याला बेशुद्ध केलं. सुदैवाने तो वाचला, पण त्याला ठार मारण्याचा कट होता, असा आरोप नितेश राणे यांनी केलाय. 4 ऑगस्ट रोजी हा हल्ला झाला. आज तो युवक मृत्यूशी झुंज देतोय, अशी माहिती नितेश राणे यांनी दिली.
नितेश राणे काय म्हणाले?
कर्जत येथील युवकावर झालेल्या हल्ल्याची माहिती देताना नितेश राणे म्हणाले, ‘ नुपूर शर्मांचं समर्थन केल्यामुळे पहिली घटना उदयपूरमध्ये घडली. नंतर अमरावतीत घडली. आज अमरावतीचा कोल्हे हत्याकांडाचा तपास एनआयए करत आहे. पहिल्या दिवसापासून भाजप आम्ही या कोणत्याही विषयाचं समर्थन नाही, हे स्पष्ट केलं. तो विषय बंद केला. पण त्यानंतर अमरावतीत कोल्हेंची हत्या करण्यात आली. 4 ऑगस्टला असाच प्रयत्न कर्जत-अहमदनगरमध्ये घडली. प्रतीक पवार नावाच्या एका युवकाला अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमाकडे जात असताना 10 ते 15 मुस्लिम युवकांनी थांबवलं. तू नुपूर शर्मांचं डीपी ठेवतोय, गावाच्या अन्य लोकांनाही ठेवायला सांगतोय.. हिंदू हिंदू म्हणून जास्त आवाज करतोयस… असं म्हणत लोकांनी त्याच्या हल्ला केला. त्यांच्या हतात हत्यार होते. त्याला खाली पाडलं. तो बेशुद्ध पडला. जमावाला तो मेलाय असं वाटलं. ते लोक तिथून निघून गेले. पण मित्र परिवार तेथे आला. लगेच त्याला अॅडमिट केलं. नंतर खासगी रुग्णालयात ठेवलंय. तो आज मृत्यूशी झुंज देतोय. त्याला 35 टाके पडलेत. बरगड्यांमध्ये वाईट मार लागलाय.
‘…तर आमचेही हात बांधलेले नाहीत’
कर्जतमधील युवकावर झालेल्या हल्ल्यानंतर इशारा देताना नितेश राणे म्हणाले, ‘ आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा देश आहे. अशा प्रकारे वारंवार हल्ले होत असतील. अमरावतीत हिंदुंना मारून टाकण्यापर्यंत मजल जात असेल तर आमचेही हात बांधेलेले नाहीत. त्याच्यावर एफआयआर झालीय. तिथल्या पीआयने हिंदुंच्याच घरी जाऊन केस दाबण्याचा प्रयत्न केला. सगळ्या हिंदु संघटनांनी एकत्र येऊन फडणवीसांशी चर्चा केली. नंतर एफआयआर घेतला गेला. पण आजही काही मुख्य आरोपी फरार आहेत. त्यांना लवकर अटत करावी, अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्री आयजी, एसपींशी बोलले आहेत. हे काही महाविकास आघाडीचं सरकार नाहीत. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक राहिलेले नाहीत. कोणत्याही हिंदुंना टार्गेट केलं तर जशास तसं उत्तर आम्हालाही देता येतं, असा इशारा नितेश राणे यांनी दिलाय.