Ladki Bahin Yojana : ‘प्रत्येक माऊलीच्या खात्यात 7500 रुपये, लपवून ठेवा…’, पंकजा मुंडे यांचं लाडकी बहीण योजनेवर मोठं वक्तव्य

"राजकारणात नवीन पाऊल ठेवणाऱ्या माणसात निरागसता असते. मला सभेत लोक जवळ पाहिजे. मी एवढी व्हीआयपी नाही. मला एवढी सेक्युरिटी आहे. मुख्यमंत्र्यांची मी लाडकी बहीण आहे. हे सरकार माझं माहेर आहे आणि मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे", असं पंकजा मुंडे आपल्या भाषणात म्हणाल्या.

Ladki Bahin Yojana : 'प्रत्येक माऊलीच्या खात्यात 7500 रुपये, लपवून ठेवा...', पंकजा मुंडे यांचं लाडकी बहीण योजनेवर मोठं वक्तव्य
पंकजा मुंडे, भाजप नेत्याImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 11, 2024 | 7:00 PM

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची नांदेडच्या भोकर येथे प्रचारसभा पार पडली. पंकजा मुंडे यांची भोकर विधानसभेच्या भाजप उमेदवार श्रीजया चव्हाण आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार संतुकराव हंबर्डे यांच्या प्रचारासाठी सभा पार पडली. “भोकर विधानसभेच्या उमेदवार ज्याच्या नावात श्री आणि जय अशा श्रीजया चव्हाण. श्रीजया चव्हाण आणि संतुक हंबर्डे दोघांनाही विजयी करा. मी 2009 पासून भाजपाची स्टार प्रचारक आहे. या वेळेस मला निवडणूक लढवायची नाही. मी मोकळीच आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सभा घेऊन उमेदवार निवडून आणायचे आहेत. शंकरराव चव्हाण यांच्यासाठी मुंडे साहेब खूप लहान होते. पण काँग्रेसमध्ये असून म्हणायचे मुंडे साहेब मोठे होतील”, असं पकंजा मुंडे म्हणाल्या.

“राजकारणात नवीन पाऊल ठेवणाऱ्या माणसात निरागसता असते. मला सभेत लोक जवळ पाहिजे. मी एवढी व्हीआयपी नाही. मला एवढी सेक्युरिटी आहे. मुख्यमंत्र्यांची मी लाडकी बहीण आहे. हे सरकार माझं माहेर आहे आणि मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे. जुन्या सरकारने काही योजना नुसत्या हवेत केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डायरेक्ट बँकेमध्ये पैसे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 2014 पूर्वी महिलांचे अकाउंट नव्हते. नरेंद्र मोदींनी 2014 ला सगळ्या देशाला बँकिंगमध्ये आणलं”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे लाडकी बहीण योजनेवर काय म्हणाल्या?

“प्रत्येक माऊलीच्या खात्यावर 7500 रुपये आले. या 7500 रुपयांचं काय करायचं? लपवून ठेवा ते. कोण कोण पैसे जपून ठेवतं सांगा बरं. मी तर ठेवते लपून. मला शंभर टक्के खात्री आहे महिलांनी या पैशांनी स्वतःसाठी काहीच केलं नाही. महिला कधीही स्वतःसाठी पैसे खर्च करत नाहीत. म्हातारा सासरा आजारी पडला तर हळूच बिचारी पैसे आणू देती. मुलीच्या क्लासची फी देते”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

“तुमचं सरकार 75 वर्ष होतं. तुम्ही माता-भगिनींसाठी, शेतकऱ्यांसाठी का योजना केली नाही? कारण तुम्हाला गरिबी माहित नाही. गणवेश घ्यायला ज्या माणसाकडे पैसे नव्हते त्या माणसांनी शिक्षण सिस्टीम बदलली. ज्या माणसाची माय चुली समोर बसून खोकलत होती त्या माणसाने गॅस योजना आणली. कुठल्याही चुकीच्या प्रचाराला तुम्ही बळी करू नका. नरेंद्र मोदी 2014 पासून 24 पर्यंत सत्तेत आहेत. कोणाच्या केसाला धक्का लावला? आमच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी योजना राबवल्या”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे यांचं नागरिकांना कळकळीचं आवाहन

“मी तुम्हाला विनंती करणार आहे. येत्या 20 तारखेला कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबा. कमळ लक्ष्मीचं वाहन आहे. श्रीजया नवीन उमेदीच्या तरुण चेहरा आहे. संतुक हंबर्डे यांना निवडून द्या. डायरेक्ट सत्तेत जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगतील ते माझ्या नांदेड जिल्ह्यासाठी करा”, असं पंकजा मुंडे यांनी केली.

“इलेक्शनमध्ये फिरून माझा अवतार झालाय. सकाळपासून जेवण नाही. संन्यास नाही रे संन्यास घ्यायचा नाही. मी वनवास भोगला, कष्ट भोगले, मोठ्या बापाच्या घरी जन्म घेऊन अनेक कष्टांना समोर गेले. मी पाच वर्ष कुठे आमदार खासदार होते का? मध्यप्रदेशला गेले. मला तिथे खूप शिकवलं. पक्षाच्या संस्कारात वाढल्यामुळे पक्षाची ताकद वाढवण्यासाठी काम करत आहे”, असं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.