अखेर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, ‘स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही…’

| Updated on: Dec 29, 2024 | 8:02 PM

पंकजा मुंडे यांनी ट्विट करत प्राजक्ता माळी हिचं समर्थन केलं आहे. पण संतोष देशमुख हत्या प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी फार काही भाष्य केलेलं नाही. पंकजा यांनी नेमकं काय ट्विट केलं आहे याची माहिती आपण जाणून घेऊयात.

अखेर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही...
अखेर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, 'स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही...'
Follow us on

बीडचे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर भाजप नेत्या तथा पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. भाजप नेते सुरेश धस यांनी बीडमधील आक्रोश मोर्चात पंकजा मुंडे यांना संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट का घेतली नाही? म्हणत प्रश्न उपस्थित केला होता. सुरेश धस यांनी अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. यानंतर आता पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत असताना इव्हेंट मॅनेजमेंटचा उल्लेख करत प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांची नावे घेतली होती. याआधी करुणा शर्मा यांनी एका व्हिडीओत प्राजक्ताचं नाव घेतल्यामुळे तिला सोशल मीडियावर सातत्याने ट्रोल केलं जात होतं. यानंतर सुरेश धस यांनी प्राजक्ताचं नाव घेतल्यानंतर तिने पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. तसेच तिने राज्य महिला आयोगातही सुरेश धस यांच्याविरोधात तक्रार केली. यानंतर आता पंकजा मुंडे यांनी ट्विट करत प्राजक्ता माळी हिचं समर्थन केलं आहे. पण संतोष देशमुख हत्या प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी फार काही भाष्य केलेलं नाही.

पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

“‘शक्ती’ शिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही. त्रिदेवही थकले की शक्तीचे आवाहन लागायचे. त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची. ‘दुर्दैवी घटना’ हे कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे. भावना कुठे आहेत? चिमुकल्यांचे बलात्कार, पाशवी अत्याचार आणि निघृण हत्या या थांबवणे शक्य आहे ना. पण कायद्याने, नियमाने! ते राहिले बाजूला नुसती चिखलफेक”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

“दुर्दैवाने soft targetआहे स्त्री आणि तिचे सत्व. काल पाहवलं नाही, पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे? तरी एका शक्तीची दुसऱ्या शक्तीला आपसूक साथ मात्र राहावी. Be strong n make us proud you all women”, अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली आहे.