AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘…हे तर पवारांनी केलेलं नाटक’, मारकडवाडी वादावरून पडळकरांनंतर आता दरेकरांचा थेट वार!

मारकडवाडी येथील ग्रामस्थानी बॅलेट पेपरवर चाचणी मतदानाची मागणी केली आहे. यावरून राजकारण चांगलंच तापलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

'...हे तर पवारांनी केलेलं नाटक', मारकडवाडी वादावरून पडळकरांनंतर आता दरेकरांचा थेट वार!
प्रवीण दरेकर
Follow us
| Updated on: Dec 10, 2024 | 6:57 PM

सोलापूर जिल्ह्यातलं मारकडवाडी हे गाव सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरलं आहे, येथील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान मॉक पोल घेण्याची परवानगी मागितली होती, मात्र त्यांना परवानगी नाकारण्यात आली. यावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आतापर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेत्यांनी मारकडवाडीला भेट दिली. दरम्यान आज महायुतीचे नेते सदाभाऊ खोत आणि भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील या गावाला भेट दिली. या गावात माहयुतीची सभा झाली. या सभेत बोलताना गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ‘100 शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्माला आले’ असा हल्लाबोल गोपीचंद पडळकर यांनी केला होता.

तालुक्यात शंभर गाव आहेत, मात्र हेच गाव निवडण्यात आलं. कारण धनगर समाज हा लोकशाही विरोधी आहे असं शरद पवार यांना दाखवायचं होतं असा आरोप देखील यावेळी गोपीचंद पडकर यांनी केला आहे. दरम्यान आता पडळकर यांच्या टीकेनंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी देखील शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले प्रवीण दरेकर? 

मारकडवाडी इथे जनतेचा आक्षेप नाही, शरद पवार आणि महाविकास आघाडीनं केलेलं हे नाटक आहे. सदाभाऊ, गोपीचंद पडळकर तिथे गेले होते, त्यावेळी खरे गावकरी तिथे उपस्थित होते. ईव्हीएमवर खापर फोडण्याचा हा प्रयत्न आहे. राम सातपुतेंची ही भावना समजून घ्या, राग समजून घ्या, चुकीचं कुणाला वाटत असेल तर कारवाईची मागणी करू शकता. त्यांच्या भाषणाचा वेगळा अर्थ काढू नका. उत्तम जानकरांनी आपली आमदारकी टिकवावी, त्यांचं सर्टिफिकेट फेक आहे. कोर्टात केस सुरू आहे. ईव्हीएमने आमदार झाले त्यावर त्यांचा विश्वास नाही.  क्षमता पाहून बोलावं असं दरेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे उत्तम जाणकर यांनी देखील गोपीचंद पडळक यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. असली बारीक 5 उंदर पवार साहेब रोज नाष्ट्याला खातात. ही उंदर तिथे जाऊन टीका करतात असं जणाकर यांनी म्हटलं आहे.

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.