‘मोठा भाऊ पाहून कुंभकर्णानेही आत्महत्या केली असती, मुनगंटीवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

गजनीच्या हिरेसारखा या सरकारला पॅालीटीकल अल्झायमर झाला आहे. या सरकारविरोधात संधी मिळेल तिथे जनतेनी असंतोष व्यक्त करा असंही यावेळी मुनगंटीवार म्हणाले.

'मोठा भाऊ पाहून कुंभकर्णानेही आत्महत्या केली असती, मुनगंटीवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
Follow us
| Updated on: Nov 28, 2020 | 4:58 PM

नागपूर : ‘कुंभकर्ण आज असता तर आत्महत्या केली असती की आमच्यापेक्षाही कुणी मोठा भाऊ आहे’ अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (sudhir Mungantiwar) यांनी नाव न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. राज्यात कोरोनापासून (Corona) ते मराठा आरक्षण (Maratha reservation) आणि वाढील वीजबिलाविरोधात विरोधक पेटून उठले आहे. याच मुद्द्यांवर सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. ते नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. (bjp leader sudhir Mungantiwar criticized on Chief Minister uddhav Thackeray in Nagpur)

यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर कठोर शब्दात टीका केली. गजनीच्या हिरेसारखा या सरकारला पॅालीटीकल अल्झायमर झाला आहे. या सरकारविरोधात संधी मिळेल तिथे जनतेनी असंतोष व्यक्त करा असंही यावेळी मुनगंटीवार म्हणाले. इतकंच नाही तर ‘फडणवीसांचं सरकार गेलं आणि फसवणाऱ्यांचे सरकार आले’ असं म्हणत मुनगंटीवार यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन सरकारवर तोफ डागली. महाविकास आघाडी सरकारने 365 दिवसांत जनतेच्या अपेक्षांचा मोठा भंग केला आहे. त्यामुळेच या सरकारचा खरा चेहरा जनतेला दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. गेल्यावर्षी देवेंद्र फडणवीसांचं सरकार गेलं आणि फसवणाऱ्यांचं सरकार आलं. त्यामुळे राज्यात वर्षभरातच जंगलराज निर्माण झालं आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

‘उलट्या बाराखडीसारखं एक वर्ष उलटंसुलटं काम करणारं सरकार’

महाविकास आघाडी सरकारकडून चांदा ते बांदाच्या लोकांना न्याय प्राप्त होईल, अशी अपेक्षा होती. सरकारने हा अपेक्षाभंग केला आहे, असं सांगतानाच मंत्रिमंडळाची यादी आपण वाचतो. तेव्हा पहिलं नाव U पासून सुरु होतं आणि शेवटचं नाव आदिती सुनील तटकरे म्हणजे A वर संपतं. जशी बाराखडी मंत्रिमंडळात उलटी झाली तसं यांचं कामंही उलटं झालं आहे. उलट्या बाराखडीसारखं एक वर्ष उलटंसुलटं काम करणारं सरकार आपण अनुभवतोय, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

तुम्ही फक्त मंत्रिपदाच्या पाट्या लावायच्या का?

लोकमान्य टिळकांचं एक वाक्य प्रसिद्ध होतं, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आज सरकारचे निर्णय जेव्हा आपण बघतो, तेव्हा आज टिळक असते तर त्यांनीच सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विचारला असता, असं मुनगंटीवार म्हणाले. एक वर्षात त्यांची कोणतीही मुलाखत बघा, भाष्य ऐका, आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावला. पण राज्य सरकारचं कार्य शून्य आहे. जे काही करायचं ते केंद्र सरकारनेचं हा शोध या सरकारने लावला, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. (bjp leader sudhir Mungantiwar criticized on Chief Minister uddhav thackeray in nagpur)

प्रत्येक मंत्री आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारने जीएसटीची रक्कम दिली नसल्याची बोंब मारत आहे. वीजबील माफ करायचं असेल तर केंद्र सरकारने पैसे द्यावेत, अशी मागणी या सरकारकडून केली जात आहे. मग तुम्ही फक्त मंत्रिपदाच्या पाट्या लावायच्या. तुमचं काम काय?, असा खणखणीत सवालही त्यांनी केला.

इतर बातम्या –

‘कोरोना व्हायरस ठाकरे सरकारला म्हणाला, नागपूरला याल तर त्रास देईन, मुंबईत तुमच्या वाटेला येणार नाही’, मुनगंटीवारांचा उपरोधिक टोला
‘दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारच्या डोक्यातील अंधार दूर झाला’, सुधीर मुनगंटीवार यांचा राज्य सरकारला टोला

(bjp leader sudhir Mungantiwar criticized on Chief Minister uddhav thackeray in nagpur)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.