‘मला मंत्रिमंडळात नाव असल्याचं सांगण्यात आलं, आणि….’, सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली खंत

महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात सुधीर मुंगंटीवार यांचे नाव वगळण्यात आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले. त्यांना पक्षाकडून वेगळी जबाबदारी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. यानंतर आता सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

'मला मंत्रिमंडळात नाव असल्याचं सांगण्यात आलं, आणि....', सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली खंत
सुधीर मुनगंटीवार
Follow us
| Updated on: Dec 16, 2024 | 4:31 PM

महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला आहे. या विस्तारात अनेक दिग्गज नेत्यांना डच्चू देण्यात आला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनादेखील मंत्रिपदाची संधी देण्यात आलेली नाही. यानंतर सुधीर मुनगंटीवार आज माध्यमांसमोर आले. यावेळी पत्रकारांनी त्यांना नाराज आहात का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी एक खंत व्यक्त करत आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं. “मी व्यथित असण्याचं कारणच नाही आणि मी कधीच व्यथित होत नाही. पक्ष मला जे पद देतो, मी त्या पदासाठी काम करतो. फक्त एवढीच इच्छा आहे, मंत्रिमंडळात माझं नाव आहे, असं सांगण्यात आलं आणि काल ते नव्हतं. एवढाच मुद्दा आहे. कालपर्यंत नाव असताना काल ते का वगळण्यात आलं? ते मला माहिती नाही. बाकी मला याबद्दलची कोणतीही माहिती नाही. मी व्यथित नाही. मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये मी गोरगरिबांचे विषय मांडायचो. आग्रहपूर्वक मांडायचो. आता विधानसभेत मांडेल”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की, वेगळी जबाबदारी पक्षाची देण्यात येणार आहे. त्यामुळे तुमचं नाव मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं का? असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांना विचारला असता, “मग तेच खरं. कारण ते सर्व त्यांनाच माहिती असणार आहे. त्यांनी सांगितलं आहे तर मग माझ्याकडून उत्तर का घेत आहात? माझं वरिष्ठ पातळीवर कुणाशी बोलणं झालं नाही. पण तुमचं झालं आहे ना, तुम्ही वरिष्ठ पातळीवर काहीतरी बोललात ना की माझ्यासाठी संघटनेचं काहीतरी पद ठेवलं आहे म्हणून”, असं मुनगंटीवार म्हणाले.

नितीन गडकरी यांच्यासोबतच्या भेटीत काय चर्चा झाली?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तुम्ही भेट घेतली आहे. नेमकी काय चर्चा झाली? असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “अहो, अशी चर्चा टीव्ही चॅनलवरुन सांगायची असते का?”, असा प्रतिप्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी केला. “शेवटी ही एक मोठ्या भावाची छोट्या भावाशी असणारी भेट आहे. या भेटीमध्ये काय होतंय हे सांगायचं असतं का? पण ते नेहमी जेव्हा-जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा मी त्यांचे मार्गदर्शन घेतो. त्यांचं मार्गदर्शन नेहमीच उचित असतं. देवेंद्र फडणवीस यांनी जे मार्गदर्शन दिलं होतं श्रद्धा आणि सबुरी तेच मार्गदर्शन नितीन गडकरी यांनी दिलं”, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.]

आता पुढची भूमिका काय?

“माझी भूमिका विधानसभेत गोर-गरिबांचे प्रश्न मांडायचे आहेत. आता मी माझी जुनी पुस्तकं काढली आहेत. सर्व संसदीय आयुदं मी वापरायचो. आता पुन्हा एकदा संसदीय आयुदं वापरण्याची सवय विकसित करायची. मी नाराज कधीच राहत नाही. मला चांगली जाणीव आहे, काल जे आपल्याकडे होतं ते उद्या जाणार आहे. उद्या आपल्याजवळ जे नाही ते परवा येणार आहे”, असं सूचक वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.